आपला जिल्हा

शेळीपालन व कुक्कुटपालन  प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न

शेळीपालन व कुक्कुटपालन  प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न
शेळीपालन व कुक्कुटपालन  प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न

Kopargaon vijay kapse दि २७ जुलै २०२६–  शेतकऱ्यांना आधुनिक व शास्त्रशुद्ध पशुपालन तसेच कृषी पूरक व्यवसायाची माहिती उपलब्ध करून देऊन त्यांचे उत्पन्न वाढविणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवत कोपरगाव येथील लोकनेते सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघ लिमिटेड येथे नुकतीच दोन दिवसीय शेळीपालन व कुक्कुटपालन विषयक प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली.

जाहिरात
या कार्यशाळेत शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत पशुपालन व कृषी पूरक उद्योगांचा अवलंब करून आर्थिक उत्पन्नात वाढ कशी साधता येईल, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणात दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, मेंढीपालन, कुक्कुटपालन, पशुखाद्य व्यवस्थापन, जनावरांचे आरोग्य, लसीकरण, रोगप्रतिबंधक उपाययोजना, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पशुपालनावर आधारित उद्योग उभारणी तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली तर  मार्गदर्शक जयंत कांबळीकर यांनी पशुपालन क्षेत्रातील आधुनिक संधी, कृषी उद्योगातील नव्या व्यवसाय कल्पना आणि स्वयंपूर्ण उद्योजक घडविण्याबाबत मार्गदर्शन केले.

जाहिरात
या प्रशिक्षणासाठी कोपरगाव, निफाड, सिन्नर, येवला आणि वैजापूर तालुक्यातील अनेक नवोद्योजक व प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. लोकनेते सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघ लिमिटेडचे चेअरमन अंबादास देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पडले. यासाठी संस्थेचे ढवळे साहेब, एडीसीसी बँकेचे व्यवस्थापक,  अनिकेत देशमुख, ॲड. जयश्री मॅडम, वैभव बंदावणे आणि कोपरगाव मराठी पत्रकार परिषदेचे तालुकाध्यक्ष अरुण कदम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे