आपला जिल्हा

अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय गुणवत्तेत राज्यात अव्वल चारमध्ये; देशात पहिल्या दहामध्ये मानांकन

अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय गुणवत्तेत राज्यात अव्वल चारमध्ये; देशात पहिल्या दहामध्ये मानांकन

कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यू 2026 सर्वेक्षणात उल्लेखनीय कामगिरी; स्वायत्त दर्जा, एनबीए-नॅक मानांकन आणि उत्कृष्ट प्लेसमेंटची दखल

जाहिरात

Sangmner vijay kapse दि २७ जुलै २०२६:
भारतातील प्रतिष्ठित कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यू (Competition Success Review) या शैक्षणिक मासिकाने जाहीर केलेल्या 2026 च्या गुणवत्ता सर्वेक्षणात अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने देशातील पहिल्या 10 महाविद्यालयांमध्ये तर महाराष्ट्रातील पहिल्या 4 महाविद्यालयांमध्ये स्थान मिळवले आहे. ही माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. बाविस्कर यांनी दिली.

जाहिरात

माजी शिक्षणमंत्री तथा लोकनेते बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे आणि संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाने सातत्याने शैक्षणिक गुणवत्ता जपली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत अग्रक्रम राखण्याबरोबरच महाविद्यालयाला दोन वेळा ‘उत्कृष्ट महाविद्यालय’ आणि प्राचार्यांना दोन वेळा ‘उत्कृष्ट प्राचार्य’ पुरस्कार मिळाले आहेत.
महाविद्यालयाला यूजीसीकडून स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा प्राप्त झाला असून अभ्यासक्रम निर्मिती, परीक्षा प्रणाली, निकाल प्रक्रिया आणि प्लेसमेंट यशस्वीपणे राबविण्यात येत आहेत. उद्योगांच्या गरजांनुसार आधुनिक अभ्यासक्रम, डिजिटल शिक्षण प्रणाली, संशोधनाला प्रोत्साहन, एनबीएचे पाच वेळा मानांकन आणि नॅकचा ‘ए प्लस’ दर्जा या बाबींची विशेष दखल सर्वेक्षणात घेण्यात आली.

जाहिरात

कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यूच्या प्रतिनिधींनी अद्ययावत प्रयोगशाळा, डिजिटल लायब्ररी, हायस्पीड इंटरनेट, आधुनिक कार्यशाळा, उत्कृष्ट पायाभूत सुविधा, हिरवाईने नटलेला परिसर, शिस्तप्रिय वातावरण, उच्चशिक्षित प्राध्यापक, संशोधनाला मिळणारे प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी असलेला समन्वय आणि विद्यार्थ्यांच्या रोजगाराच्या संधी यांचा अभ्यास करून हे मानांकन जाहीर केले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, कार्यकारी विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, अकॅडमी डायरेक्टर डॉ. जे. बी. गुरव, प्राचार्य डॉ. पी. आर. बाविस्कर, रजिस्ट्रार प्रा. विजय वाघे, विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

गुणवत्तेची परंपरा कायम’ –  शरयू देशमुख
“लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात असूनही अमृतवाहिनी शिक्षण संस्थेने सातत्याने गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले आहे. संशोधनाभिमुख शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी असलेल्या समन्वयामुळे विद्यार्थ्यांना उत्कृष्ट पॅकेजवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. स्वायत्त दर्जा आणि प्राप्त झालेली विविध मानांकने हे संपूर्ण संस्थेच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे,” असे कार्यकारी विश्वस्त  शरयू देशमुख यांनी सांगितले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे