आपला जिल्हा

अमृतवाहिनीतील गुणवत्तेच्या शिक्षणामुळे अनेक विद्यार्थी जगात – माजीमंत्री बाळासाहेब थोरात

अमृतवाहिनीतील गुणवत्तेच्या शिक्षणामुळे अनेक विद्यार्थी जगात – माजीमंत्री बाळासाहेब थोरात
अमृतवाहिनीला ए.डी.आर सेंटर ची मान्यता – डॉ.कलैसेल्वन

49 व्या स्थापना दिनानिमित्त अमृतवाहिनीत विविध कार्यक्रम

Sangmner vijay kapse दि ८ ऑगस्ट २०२६थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे याकरता अमृतवाहिनी शिक्षण संस्थेची 1978 मध्ये स्थापना केली. संस्थेतील गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे अनेक माजी विद्यार्थी देशात व जगात विविध ठिकाणी अत्यंत यशस्वीपणे मोठ्या पदावर कार्यरत असून संस्थेसाठी हे अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी महसूल व शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे तर महाराष्ट्रात प्रथमच अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीला ए.डी.आर सेंटर दिले असल्याचे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव डॉ.व्ही.कलाईसेल्वन यांनी केले आहे.

जाहिरात

अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने 49 व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मा.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे सचिव डॉ.व्ही.कलाईसेल्वन, इशा थेरपूटिक्स न्यू जर्सी अमेरिकेचे संचालक डॉ. मनोज जाधव, ओराह न्यूट्रिकेमचे संचालक डॉ.रोहित डूबे पाटील, लक्ष्मणराव कुटे, कार्यकारी विश्वस्त  शरयू देशमुख, डॉ.जयश्री थोरात, कविता  डूबे, तुळशीनाथ भोर,विलास वर्पे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा.व्ही.बी.धुमाळ, डायरेक्टर अकॅडमी डॉ.जे.बी.गुरव, प्राचार्य डॉ. प्रसाद बाविस्कर, कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.मच्छिंद्र चव्हाण, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.मनोज शिरभाते, डॉ.बाबासाहेब लोंढे,  जे.बी.सेठी, अंजली कन्नावार, आशिष कुमार, विलास भाटे, प्रा.विजय वाघे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी अमृतवाहिनी तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रोबोटिकने आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले.

जाहिरात

यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री संस्थेची स्थापना केली. यानंतर आपल्या विद्यार्थ्यांना उच्चतंत्र शिक्षण मिळावे याकरता 1978 मध्ये अमृतवाहिनी शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेसाठी स्वर्गीय वसंतदादा पाटील यशवंतराव चव्हाण यांनी मदत केली आणि म्हणून त्यांच्या स्मरणार्थ आपण वसंततीर्थ व यशवंततिर्थ निर्माण केले. अमृतवाहिनी संस्थेने सातत्याने गुणवत्ता पूर्ण वाटचाल केली आहे. संस्थेच्या विविध विभागांमधील अनेक विद्यार्थी देशात व विदेशात मोठ्या पदांवर कार्यरत आहे. तालुक्यामधील जवळजवळ प्रत्येक कुटुंबांमधून इंजिनियर झाले असून त्यामुळे कुटुंबांमध्ये समृद्धी आली आहे. तालुक्याच्या विकासाबरोबर शैक्षणिक क्रांती झाली असून हे तालुक्याच्या समृद्धीचे प्रतीक आहे. यापुढील काळातही नावलौकिका प्रमाणे गुणवत्ता टिकवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे असे आवाहन त्यांनी केले.

जाहिरात

तर केंद्रीय सचिव डॉ.व्ही.कलाईसेल्वन म्हणाले की, माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागात असूनही अत्यंत चांगल्या सुविधा या संस्थेने विद्यार्थ्यांना दिल्या आहे.आरोग्याचे महत्त्व मोठे असून अनेक औषधांचे इफेक्ट आणि साईड इफेक्ट माणसावर पडत असतात परंतु ज्या औषध किंवा गोळ्यांमुळे साईड इफेक्ट होतात त्याची तात्काळ तक्रार नोंदणी आता अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेजमध्ये करता येणार आहे. याचबरोबर मेडिकल उपकरणांच्या बाबतीत काही तक्रारी असल्या तर आपल्याला त्या नोंदवता येणार आहे.तर डॉ.मनोज जाधव म्हणाले की, संस्थेतील गुणवत्ता संशोधनाला वाव आणि विद्यार्थी केंद्रित शिक्षण यामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली संधी मिळत आहे. नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना संशोधनांमध्ये प्रोत्साहन द्यावे असे आवाहन त्यांनी केले. तर डॉ.रोहित डूबे म्हणाले की, ग्रामीण भागात असूनही अमृतवाहिनी संस्थेने आपला दर्जा राखला आहे. शिस्त चांगले वातावरण गुणवत्ता यामुळे या विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठी मागणी असल्याचे ते म्हणाले. यावेळी डॉ.जयश्रीताई थोरात, सौ.शरयूताई देशमुख यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त  शरयू  देशमुख यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.मयुरी गाडे यांनी केले उपप्राचार्य प्रा. जी.बी.काळे यांनी आभार मानले. याप्रसंगी विविध फार्मसी महाविद्यालयांचे प्राचार्य व प्रतिनिधी तसेच अमृतवाहिनी संस्थेतील विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी – ए. डी. आर केंद्र

प्रत्येक माणसासाठी औषधे ही गरजेची असून काही औषधांमुळे काही व्यक्तींना त्याचे साईड इफेक्ट होतात. या औषधांच्या मधून झालेल्या साईड इफेक्ट च्या तक्रारी एडीआर केंद्रात करता येणार असून मेडिकल उपकरणाबाबतही काही तक्रारी असल्या तर अमृतवाहिनीच्या फार्मसी मधील ए.डी.आर केंद्रात करता येणार आहे या माध्यमातून थेट केंद्रीय मंत्रालयापर्यंत औषधे उपकरणांबाबतच्या आपल्या तक्रारी पोचणार असून ग्रामीण भागात फार्मसी महाविद्यालयात सुरू झालेले हे पहिले एडवर्स ड्रग्स रिपोर्ट केंद्र ठरले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे