Kopargaon vijay kapse दि १० सप्टेंबर २०२६: “वृद्धापकाळात दातांच्या समस्यांमुळे होणारा त्रास टाळायचा असेल, तर लहानपणापासूनच दातांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. दात केवळ अन्न चावण्यासाठीच नव्हे, तर स्पष्ट बोलण्यासाठी, चेहऱ्याचे सौंदर्य आणि प्रसन्न हास्यासाठीही महत्त्वाचे आहेत,” असे मार्गदर्शन इंडियन डेंटल असोसिएशनचे डॉ. अंकित कृष्णानी यांनी वारी येथील विद्यार्थ्यांना केले.जाहिरात
कोपरगाव तालुक्यातील वारी येथील राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ‘मोफत मदत सेवा केंद्रा’च्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त श्री रामेश्वर विद्यालय आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वारी येथे ‘मोफत दंत तपासणी व मौखिक आरोग्य’ या विषयावर श्री रामेश्वर विद्यालयात विशेष मार्गदर्शन शिबिराचे मंगळवारी (दि.8) आयोजन करण्यात आले होते.जाहिरात
यावेळी डॉ. कृष्णानी यांनी विद्यार्थ्यांना दात किडण्याची कारणे, दंत स्वच्छतेचे महत्त्व आणि दातांची योग्य निगा कशी राखावी, याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य दिवाकर निळे होते.
यावेळी व्यासपीठावर टेके पाटील ट्रस्टचे अध्यक्ष पत्रकार रोहित टेके, डॉ. अंकित कृष्णानी, डॉ. अस्मिता लाडे, डॉ. श्रद्धा तिरमखे व डॉ. मानसी गंगवाल, माजी सरपंच बाबासाहेब शिंदे, भारतीय जैन संघटनेचे नरेंद्र ललवानी, माजी ग्रा.पं.सदस्य गोरख टेके, सामाजिक कार्यकर्ते दिनेश निकम, मोनिका गुंजाळ,माजी उपसरपंच रामदास सोनवणे, मुख्याध्यापक शरीफ शेख, मुख्याध्यापक चंद्रकांत माळी, उत्तमराव वाकचौरे, पोपट समिंदरे, राजेंद्र बाराहाते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोहित टेके यांनी केले.जाहिरात
डॉ. कृष्णानी म्हणाले, “दातांमध्ये कोणताही कीडा नसतो; आपण खाल्लेले अन्न दातांच्या मध्ये अडकून राहिल्यानंतर ते सडते आणि त्यातून तयार होणारे ॲसिड दातांचे नुकसान करते. त्यामुळे हे ॲसिडच दातांचे खरे शत्रू आहे,” दात घासताना कडक ब्रशचा वापर टाळून मऊ (सॉफ्ट) ब्रश वापरावा, ब्रश पुढे-मागे जोरात न घासता हिरड्यांकडून दातांच्या दिशेने हळुवार फिरवावा, तसेच दातांची बाहेरील व आतील बाजू, चावण्याचा पृष्ठभाग आणि सर्व भाग व्यवस्थित स्वच्छ करावेत, दातांसोबत जीभ स्वच्छ ठेवणेही महत्त्वाचे असून, टंग क्लिनरच्या साहाय्याने जीभ स्वच्छ करण्याचा सल्ला देत डॉ. कृष्णानी यांनी विद्यार्थ्यांमधील दात किडण्याबाबतचा गैरसमज दूर केला.जाहिरात
या शिबिराच्या पहिल्या टप्प्यात श्री रामेश्वर विद्यालयातील १८० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची दंत तपासणी करण्यात आली. दोन्ही शाळांमधील ३८० पेक्षा अधिक विद्यार्थी या उपक्रमास उपस्थित होते. डॉ. अंकित कृष्णानी, डॉ. अस्मिता लाडे, डॉ. श्रद्धा तिरमखे व डॉ. मानसी गंगवाल यांनी विद्यार्थ्यांची दंत तपासणी केली.
मार्गदर्शनादरम्यान विद्यार्थ्यांनी दातांची स्वच्छता, दात किडणे, ब्रश करण्याची योग्य पद्धत आदींबाबत विचारलेल्या प्रश्नांना डॉ. कृष्णानी व अन्य दंततज्ज्ञांनी उत्तरे दिली. संवादात्मक पद्धतीने झालेल्या या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये दंत स्वच्छतेबाबत उत्साह निर्माण झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास शेळके यांनी केले तर गोरख टेके यांनी आभार मानले. शिबिर यशस्वीतेसाठी ट्रस्टचे स्वयंसेवक तसेच दोन्ही शाळेतील सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले. यावेळी शिक्षणप्रेमी ग्रामस्थ, दोन्ही शाळांचे सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.