आपला जिल्हा

अभिषेक निकमची राष्ट्रीय अथेलेटिक्समध्ये भरारी; संजीवनी अकॅडमीच्या शिरपेचात मानाचा तुरा

अभिषेक निकमची राष्ट्रीय अथेलेटिक्समध्ये भरारी; संजीवनी अकॅडमीच्या शिरपेचात मानाचा तुरा

सीबीएसई राष्ट्रीय स्पर्धेत भालाफेक प्रकारात सहभाग; पतियाळा येथे देशभरातील गुणवंत खेळाडूंशी केली स्पर्धा

Kopargaon vijay kapse दि ३० ऑक्टोबर २०२६ : संजीवनी अकॅडमी, कोपरगाव येथील विद्यार्थी अभिषेक शिवाजी निकम याने सीबीएसई राष्ट्रीय स्तरावरील अथेलेटिक्स स्पर्धा २०२६ मध्ये भालाफेक या क्रीडा प्रकारात सहभाग नोंदवून संजीवनी अकॅडमीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. पंजाबमधील पतियाळा येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत सहभागी होण्याचा मान मिळाल्याने अभिषेकच्या क्रीडाप्रवासातील ही एक महत्त्वपूर्ण उपलब्धी ठरली आहे.

जाहिरात

अभिषेकने राहाता, जिल्हा अहिल्यानगर येथे आयोजित सीबीएसई क्लस्टर स्तरावरील अथेलेटिक्स स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील सीबीएसई संलग्न शाळांमधील खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर त्याची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली. त्याच्या मेहनतीला, जिद्दीला, शिस्तीला आणि खेळातील सातत्यपूर्ण सरावाला मिळालेली ही महत्त्वपूर्ण पावती मानली जात आहे.

जाहिरात

सीबीएसई राष्ट्रीय अथेलेटिक्स स्पर्धेत देशाच्या विविध राज्यांतील गुणवंत खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अशा व्यापक स्तरावरील स्पर्धेत सहभागी होत अभिषेकला आपले क्रीडा कौशल्य सादर करण्याची, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचा अनुभव घेण्याची तसेच विविध राज्यांतून आलेल्या प्रतिभावान खेळाडूंशी स्पर्धा करण्याची मौल्यवान संधी मिळाली.

जाहिरात

खेळातून घडते सक्षम व्यक्तिमत्त्व!

खेळ हा केवळ विजय-पराजयापुरता मर्यादित नसून शिस्त, संघभावना, आत्मविश्वास, संयम, नेतृत्वगुण आणि प्रतिकूल परिस्थितीतही प्रयत्न सुरू ठेवण्याची वृत्ती विकसित करणारे प्रभावी माध्यम आहे. विशेषतः अथेलेटिक्ससारख्या खेळांमध्ये शारीरिक क्षमता, तंत्रशुद्ध सराव, एकाग्रता आणि मानसिक कणखरता यांना अनन्यसाधारण महत्त्व असते.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबतच क्रीडाक्षेत्रातील संधी उपलब्ध करून देण्यावर संजीवनी अकॅडमीचा विशेष भर आहे. अभिषेकचा राष्ट्रीय स्तरावरील सहभाग हा अकॅडमीतील इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरणारा आहे.

संजीवनीच्या संचालिका डाॅ. मनालीताई कोल्हे यांच्या समवेत राष्ट्रीय खेळाडू अभिषेक निकम. यावेळी सुधा सुब्रमण्यम व  सुर्यवंशी उपस्थित होते.

अभिषेकच्या या उल्लेखनीय क्रीडाप्रवासाबद्दल संजीवनीचे अध्यक्ष  नितीन कोल्हे आणि मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अकॅडमीच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांनी एका छोटेखानी कार्यक्रमात अभिषेकचा सत्कार करून त्याच्या क्रीडाक्षेत्रातील प्रयत्नांचे कौतुक केले.

यावेळी प्राचार्या सुधा सुब्रमण्यम आणि क्रीडा प्रशिक्षक  राहुल सूर्यवंशी उपस्थित होते. अभिषेकच्या या यशस्वी वाटचालीमुळे संजीवनी अकॅडमीच्या क्रीडा क्षेत्रातील प्रयत्नांना नवी प्रेरणा मिळाली असून, भविष्यातही अभिषेक आपल्या क्रीडा कौशल्याच्या जोरावर अधिक उंची गाठेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे