आपला जिल्हा

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात आधार नोंदणी व अद्ययावतीकरण शिबिर यशस्वी

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात आधार नोंदणी व अद्ययावतीकरण शिबिर यशस्वी

अकरावी-बारावीच्या सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी घेतला लाभ; वेळ व प्रवासखर्चाची बचत

Kopargaon vijay kapse दि ३० ऑक्टोबर २०२६ : श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स (एस.एस.जी.एम.) महाविद्यालय, कोपरगाव येथे भारतीय डाक विभाग आणि महाविद्यालय प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेले आधार नोंदणी व अद्ययावतीकरण शिबिर उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीपणे पार पडले. दि. ८ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत झालेल्या या शिबिराचा सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.

जाहिरात

विद्यार्थ्यांना आधार कार्डशी संबंधित विविध कामांसाठी महाविद्यालयाबाहेर जावे लागू नये, तसेच त्यांचा वेळ आणि प्रवासखर्च वाचावा, या उद्देशाने महाविद्यालयाच्या परिसरातच ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक वेळापत्रकात अडथळा न आणता आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाची प्रक्रिया पूर्ण करता आली.

कोपरगाव पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला एस.एस.जी.एम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे, श्रीरामपूर डाक विभागाचे अधीक्षक जनवाडे (SPOS),  केंद्रे (SDIP) तसेच कोपरगावचे पोस्टमास्तर  रवींद्र परदेशी यांचे मार्गदर्शन लाभले. भारतीय डाक विभागाचे आधार ऑपरेटर प्रसाद वसमतकर यांनी शिबिरातील कामकाज तत्परतेने पार पाडत विद्यार्थ्यांना आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाची सेवा उपलब्ध करून दिली.

जाहिरात

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी तसेच विविध शासकीय योजना, शिष्यवृत्ती आणि दैनंदिन प्रशासकीय कामकाजासाठी आधार कार्डवरील माहिती अद्ययावत असणे महत्त्वाचे आहे. ही गरज लक्षात घेऊन अकरावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच आधारविषयक सेवा उपलब्ध करून देण्यात आली. या सुविधेमुळे विद्यार्थ्यांचा वेळ, श्रम आणि प्रवासावरील खर्च मोठ्या प्रमाणात वाचण्यास मदत झाली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. रवींद्र हिंगे, पर्यवेक्षक  माधव रेवगडे, कला, वाणिज्य व विज्ञान विभागांचे विभागप्रमुख, यू-डायस प्लस समितीचे चेअरमन  संदिप सोनवणे व समितीचे सर्व सदस्य, वर्गशिक्षक तसेच प्राध्यापकवृंद यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले. महाविद्यालय प्रशासनाने आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे संपूर्ण शिबिराचे कामकाज सुरळीतपणे पार पडले.

जाहिरात

महाविद्यालयातच आधारविषयक सेवा उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना मोठी सोय झाली. या विद्यार्थीहिताच्या उपक्रमाबद्दल विद्यार्थी व पालकांनी भारतीय डाक विभाग तसेच एस.एस.जी.एम. महाविद्यालय प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले. विद्यार्थ्यांच्या सोयीला प्राधान्य देत शैक्षणिक संस्था आणि शासकीय विभागांनी परस्पर सहकार्याने अशा प्रकारचे उपक्रम राबविल्यास विद्यार्थ्यांना आवश्यक शासकीय सेवा त्यांच्या शैक्षणिक परिसरातच सहज उपलब्ध होऊ शकतात, हे या शिबिरातून अधोरेखित झाले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे