आपला जिल्हा

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात विद्यार्थ्यांनी सजग राहणे गरजेचे;  पोलिस निरीक्षक डमाळे यांचे के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात मार्गदर्शन

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात विद्यार्थ्यांनी सजग राहणे गरजेचे;  पोलिस निरीक्षक डमाळे यांचे के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात मार्गदर्शन

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात विद्यार्थ्यांनी सजग राहणे गरजेचे;  पोलिस निरीक्षक डमाळे यांचे के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात मार्गदर्शन

Kopargaon vijay kapse दि ३० ऑक्टोबर २०२६ : सध्याचे युग हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे (AI) युग असून या तंत्रज्ञानाचे अनेक फायदे असले तरी त्याचा गैरवापर झाल्यास त्याचे गंभीर परिणामही होऊ शकतात. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना विद्यार्थ्यांनी सजग आणि सावध राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांनी केले.

जाहिरात

के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित विद्यार्थी मार्गदर्शन सत्रात ते बोलत होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण, करिअर, मोबाईलचा वापर, इंटरनेट तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या योग्य वापराबाबत मार्गदर्शन केले.

पोलिस निरीक्षक डमाळे म्हणाले की, कोणत्याही ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी अथक परिश्रम करण्याबरोबरच निश्चित ध्येय असणे आवश्यक आहे. आपल्या आवडीचे आणि क्षमतेला अनुरूप करिअरचे क्षेत्र विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर ओळखणे त्यांच्या भविष्यासाठी निश्चितच लाभदायक ठरते. मात्र, करिअरच्या या प्रवासात मोबाईलचा अतिवापर, इंटरनेटचा चुकीचा वापर आणि कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर ही मोठी आव्हाने आहेत. विद्यार्थ्यांनी या धोक्यांची जाणीव ठेवून तंत्रज्ञानाचा सकारात्मक आणि विधायक वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

जाहिरात

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे म्हणाले की, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महाविद्यालयाकडून सकारात्मक पावले उचलली जात आहेत. त्याचबरोबर महाविद्यालयाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोपरगाव पोलिस दलाचे नेहमीच भरीव सहकार्य मिळत आले आहे. त्याबद्दल महाविद्यालय पोलिस दलाचे सदैव कृतज्ञ आहे.

जाहिरात

 

यावेळी मंचावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब सोनवणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रा. संदीप जगझाप यांनी मानले, तर सूत्रसंचालन प्रा. जावेद शाह यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे