आ.विवेक कोल्हे यांचा पाठपुरावा कोपरगाव आगाराला १५ नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बस मंजूर, तीन बस सेवेत दाखल होणार
आमदार विवेक कोल्हे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा सकारात्मक प्रतिसाद
जाहिरात
Kopargaon vijay kapse दि १४ नोव्हेंबर २०२६ : कोपरगावकरांच्या सार्वजनिक परिवहन सेवेला अधिक सक्षम आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, आमदार विवेकभैय्या कोल्हे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कोपरगाव एसटी आगारासाठी १५ नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बस मंजूर झाल्या आहेत. त्यातील बारा बस उपलब्ध झाल्या असून तीन बस देखील येत्या काही दिवसात आगारात उपलब्ध होत आहेत यासाठी आ.विवेक कोल्हे यांनी केलेला पाठपुरावा यशस्वी झाला असून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने कोपरगावच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महत्त्वपूर्ण भर पडली आहे.
जाहिरात
मंजूर झालेल्या १५ बसपैकी १२ नवीन बस कोपरगाव आगारात दाखल झाल्या असून, त्या प्रवाशांच्या सेवेत सुरू करण्यात आल्या आहेत. आणखी २ बस सायंकाळपर्यंत आगारात दाखल होणार असून, उर्वरित १ बस पुढील चार ते पाच दिवसांत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे लवकरच कोपरगाव आगाराच्या ताफ्यात सर्व १५ नवीन बस दाखल होतील.जाहिरात
कोपरगाव तालुक्यासह ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी, महिला, नोकरदार आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी बससेवा ही दैनंदिन जीवनातील महत्त्वाची सुविधा आहे. प्रवाशांची वाढती संख्या, उपलब्ध बसची गरज आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने नवीन बस उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी सातत्याने लावून धरली होती. त्यांच्या या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
यासोबतच माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनीही कोपरगाव बसस्थानकातील विविध सुविधा, प्रवाशांच्या अडचणी आणि बसस्थानकाच्या विकासाबाबत वेळोवेळी सूचना करून पाठपुरावा केला आहे. सार्वजनिक परिवहन सेवा केवळ बसच्या संख्येपुरती मर्यादित न राहता प्रवाशांना बसस्थानकातही आवश्यक सुविधा मिळाव्यात, यासाठी त्यांनी सातत्याने भूमिका मांडली आहे. कोपरगावच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी आमदार विवेकभैय्या कोल्हे व माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रयत्नांतून हा महत्त्वपूर्ण निर्णय प्रत्यक्षात आला आहे.
या सहकार्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजपा-महायुती सरकारचे आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.कोपरगावच्या सार्वजनिक परिवहन सेवेला नवी गती देणारा हा निर्णय प्रवाशांसाठी निश्चितच दिलासादायक ठरणार आहे.
MH14NP6812 व MH 14NP6813 या दोन बस आज उपलब्ध होत असून आ.कोल्हे यांच्याकडून या नवीन दाखल होणाऱ्या बसचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले आहे.