दृष्टिदा आय हॉस्पिटलमुळे अहिल्यानगरसह ग्रामीण भागातील रुग्णांना मिळणार दर्जेदार नेत्रोपचार

दृष्टिदा आय हॉस्पिटलमुळे अहिल्यानगरसह ग्रामीण भागातील रुग्णांना मिळणार दर्जेदार नेत्रोपचार
केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते उद्घाटन; आमदार सत्यजीत तांबे, खासदार डॉ. निलेश लंके यांची उपस्थिती

Ahilyanagar vijay kapse दि १६ नोव्हेंबर २०२६ : आयुर्वेदाच्या प्राचीन आणि समृद्ध परंपरेला आधुनिक संशोधनाची जोड देत नेत्ररोगांवर उपचार करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘दृष्टिदा आयुर्वेदिक आय हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर’चा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते या हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले.

या सोहळ्यास आमदार सत्यजीत तांबे, खासदार डॉ. निलेश लंके आणि लोकप्रिय व्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आमदार सत्यजीत तांबे यांनी आयुर्वेदाच्या माध्यमातून आधुनिक उपचारपद्धती विकसित करण्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी अशा आरोग्य संस्थांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.

भारतीय आयुर्वेद परंपरा आणि आधुनिक संशोधन यांचा समन्वय साधून नेत्ररोगांवर उपचार करण्याचा दृष्टिदा हॉस्पिटलचा उपक्रम निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या केंद्रामुळे अहिल्यानगर शहरासह परिसरातील ग्रामीण भागातील रुग्णांना नेत्रोपचारांच्या सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
रुग्णसेवेचा ध्यास घेऊन सुरू झालेल्या या नव्या सेवापर्वाबद्दल अरुण (दादा) जाधव, अरविंद जाधव, धनंजय जाधव, डॉ. गणेश जाधव यांच्यासह संपूर्ण जाधव परिवार आणि दृष्टिदा हॉस्पिटलच्या टीमचे अभिनंदन करण्यात आले.




