आपला जिल्हा

कोपरगाव मतदारसंघातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांच्या ३.३४ कोटींच्या विकास कामांना प्रशासकीय मंजुरी- आ. आशुतोष काळे

कोपरगाव मतदारसंघातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांच्या ३.३४ कोटींच्या विकास कामांना प्रशासकीय मंजुरी- आ. आशुतोष काळे

कोपरगाव मतदारसंघातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांच्या ३.३४ कोटींच्या विकास कामांना प्रशासकीय मंजुरी- आ. आशुतोष काळे

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २० नोव्हेंबर २०२६:-कोपरगाव मतदारसंघातील अनुसूचित वस्तीत मुलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आ. आशुतोष काळे यांचा सातत्याने महायुती शासनाकडे पाठपुरावा सुरु असतो. याच पाठपुराव्यातून जिल्हा समाजकल्याण विभागाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे या योजनेअंतर्गत कोपरगाव मतदारसंघातील २९ गावातील ६१ वाड्या वस्त्यांमधील ७० कामांसाठी २०२६-२०२७ या आर्थिक वर्षातून ३.३४ कोटींच्या निधीला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

जाहिरात

यामध्ये कोपरगाव मतदारसंघातील आंचलगाव येथे जाधव वस्ती वीज पुरवठा करण्यासाठी २ लाख, बोलकी येथील इंदिरानगरमध्ये कॉंक्रीट रस्त्यासाठी ४ लाख व बंदिस्त गटारीसाठी ४ लाख, ब्राम्हणगाव गावठाण येथे कॉंक्रीट रस्ता व पेंव्हिंगब्लॉकसाठी २ लाख, गंगावणे वस्ती वीज पुरवठा करणे २ लाख व शिंगाडे वस्ती रवंदे रोड वीज पुरवठा करणे १ लाख, कान्होबावाडी काँक्रीट रस्ता ५ लाख व रस्ता खडीकरण करणे ५ लाख, काकडी येथील ठोंबरे-बोरुडे वस्ती पाणी पुरवठा करणे ६ लाख, निवृत्ती सोनवणे वस्ती पेव्हिंगब्लॉक बसविणे १० लाख, आनंदवाडी वीज पुरवठा करणे १० लाख, घेगडमल वस्ती कॉंक्रीट रस्त्यासाठी ५ लाख, कुंभारी गावठाण बंदिस्त गटारसाठी ६ लाख, करंजी गावठाण पेव्हिंगब्लॉक बसविणे ५ लाख, दत्तनगर वीज पुरवठा करणे ८ लाख, शिंदेमळा पाणी पुरवठा करणे ५ लाख, वडाची वस्ती वीज पुरवठा करणे २ लाख व पवार वस्ती पेव्हिंगब्लॉक बसविणे ५ लाख, कोळपेवाडी येथील महेश्वरनगर मध्ये काँक्रीट रस्ता व पेव्हिंगब्लॉक २ लाख व दत्तनगर वीज पुरवठा करणे १० लाख, कासली येथील गावठाण वस्ती वीज पुरवठा करणे ६ लाख व काँक्रीट रस्ता ६ लाख, चासनळी येथील धेनकवस्ती वीज पुरवठा करणे २ लाख, चांदेकसारे गावठाण वीज पुरवठा करणे ५ लाख, देर्डे कोऱ्हाळे गावठाण काँक्रीट रस्ता ३ लाख व वीज पुरवठा २ लाख, विघे वस्ती रस्ता डांबरीकरण करणे १८ लाख, उल्हासनगरमध्ये बंदिस्त गटार करणे ५ लाख, धामोरी येथील गावठाण राजवाडामध्ये बंदिस्त गटार ३ लाख, नवनाथ नगर काँक्रीट रस्ता ३.५० लाख, धोत्रे येथील भाटेवस्ती गावठाण पाण्याच्या टाकीशेजारी वीज पुरवठा करणे १ लाख, पोटेवस्ती गावठाण मारुती मंदिर शेजारी वीज पुरवठा करणे १.५० लाख व रोकडेवस्ती घोयेगाव रोड रस्ता खडीकरण करणे ४ लाख, धारणगाव येथील चंदनशिव वस्ती बंदिस्त गटार २ लाख, देवी वस्ती वीज पुरवठा करणे ५ लाख व रस्ता खडीकरण करणे ५ लाख, रणशूरवस्ती रस्ता खडीकरण व मुरूमीकरण ९ लाख, तळेगाव मळे गावठाण पेव्हिंग ब्लॉक बसविणे ५ लाख, मनेगाव गावठाण वीज पुरवठा करणे २ लाख व मनेगाव-कारवाडी वीज पुरवठा करणे ५ लाख, मढी खु. येथील भागवत वस्ती वीज पुरवठा करणे २ लाख, मंजूर येथील हांडेवाडी फाटा वीज पुरवठा करणे १ लाख, मळेगाव थडी येथील आंबेडकरनगरमध्ये बंदिस्त गटार २.२५ लाख, जवळके गावठाण वीज पुरवठा करणे ३ लाख, जेऊर कुंभारी गावठाण वीज पुरवठा करणे ६. लाख, संजयनगर काँक्रीट रस्ता ४ लाख, बोरावके वस्ती वीज पुरवठा करणे ५ लाख, मारुती मंदिर रस्ता मजबुतीकरण करणे १० लाख, आबनावे वस्ती रस्ता मजबुतीकरण करणे ०५ लाख, सुरेगाव येथील निकम वस्ती अंतर्गत रस्ता करणे २ लाख व पेव्हिंगब्लॉक बसविणे ३ लाख, सुरेगाव रोड- बाबासाहेब आंबेडकरनगर अंतर्गत रस्ता करणे ५ लाख व मलनिस्सारणसाठी २ लाख, आनंदनगर-महात्मा फुलेनगर काँक्रीट रस्ता ३ लाख व मलनिस्सार/मुतारी बांधणे ३ लाख व साठेनगर काँक्रीट रस्ता ८ लाख, शिंगणापूर गावठाण पेव्हिंग ब्लॉक बसविणे ४ लाख, गणेशनगर येथे पेव्हिंग ब्लॉक बसविणे ७ लाख, संजीवनी गेट काँक्रीट रस्ता ८ लाख, श्रीकृष्ण नगर काँक्रीट रस्ता ५ लाख, वेस सोयगाव येथील आंबेडकर नगर काँक्रीट रस्ता ४ लाख, भिमनगर सार्वजनिक शौचालय बांधकाम १ लाख व वीज पुरवठा २ लाख, डाऊच खु. येथील कानडेवस्ती (राजवाडा) पाणी पुरवठा ४ लाख व खरात वस्ती पानमळा रस्ता खडीकरण करणे ८ लाख, रवंदे येथील हनुमानवाडी काँक्रीट रस्ता १० लाख, मळेगावथडी रोड बंदिस्त गटार १० लाख, धुळे वस्ती काँक्रीट रस्ता ५ लाख, टाकळी गावठाण इंदिरानगर वीज पुरवठा करणे ५ लाख, वेळापूर येथील मोकळ वस्ती चर रस्ता काँक्रीट करण्यासाठी ५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. असा एकूण ३.३४ कोटींचा निधीस प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.

जाहिरात

या विकास कामांमुळे कोपरगाव तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांमधील रस्ते, गटार, वीज आणि पाणी पुरवठ्याच्या सुविधांना मोठी चालना मिळणार असून नागरिकांना मुलभूत सुविधा मिळणार असल्याने आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहे. यापूर्वी देखील आ.आशुतोष काळे यांच्या माध्यमातून विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यावधींचा निधी उपलब्ध होऊन अनेक विकास कामे पूर्ण झाले असून उर्वरित कामांच्या प्रस्तावांनाही लवकरच मंजुरी मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मोठ्या प्रमाणात वाड्या वस्त्यांवरील विविध कामांसाठी निधी दिल्याबद्दल २९ गावातील नागरीकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे