आपला जिल्हा

अहिल्यानगर बेसबॉल लीग आमदार आशुतोष काळेंच्या हस्ते बक्षीस वितरण

अहिल्यानगर बेसबॉल लीग आमदार आशुतोष काळेंच्या हस्ते बक्षीस वितरण

एपी ऑल स्टार उपविजेता; आमदार आशुतोषदादा काळे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण

Kopargaon vijay kapse दि २६ नोव्हेंबर २०२६- महाराष्ट्र राज्य बेसबॉल असोसिएशन, अहिल्यानगर बेसबॉल असोसिएशन आणि के. जे. सोमैया महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या मैदानावर २२ ते २४ नोव्हेंबरदरम्यान आयोजित राज्यस्तरीय ‘अहिल्यानगर बेसबॉल लीग २०२६’ स्पर्धेत किर्ती कार्डिनल्स संघाने विजेतेपद पटकावले, तर एपी ऑल स्टार संघाला उपविजेतेपद मिळाले. स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील १२० खेळाडूंनी सहभाग घेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.

जाहिरात

स्पर्धेत तृतीय क्रमांक औटी हिटर्स, तर चतुर्थ क्रमांक अमृत डॉजर्स संघाने मिळविला. सर्व संघांनी चुरशीच्या लढती देत प्रेक्षकांची मने जिंकली.

आमदार आशुतोषदादा काळे यांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी ते म्हणाले, अशा क्रीडा स्पर्धांमुळे युवकांमधील क्रीडागुणांना वाव मिळतो. खेळाडूंमध्ये जिद्द, चिकाटी, शिस्त आणि सांघिक भावना निर्माण होते. उदयोन्मुख खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी मिळण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वपूर्ण आहेत.

जाहिरात

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामुळे अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यातील बेसबॉल खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले.

यावेळी कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त संदीप रोहमारे, राजेश ठोळे, प्रसाद नाईक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे, नगरसेवक वाल्मिक लहिरे, अरुण चंद्रे, मनोज नरोडे, अनिरुद्ध काळे, के. बी. पी. विद्यालयाचे मुख्याध्यापक जाधव, प्रा. सुनील कुटे, अक्षय आव्हाड, मकरंद कोऱ्हाळकर, प्रवीण मुंगसे, कन्हैया गंगुले, शमित माळी, विशाल गायकवाड आदी उपस्थित होते.

जाहिरात

प्रास्ताविक अहिल्यानगर बेसबॉल असोसिएशनचे अध्यक्ष अरुण चंद्रे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सुनील कुटे यांनी केले, तर आभार महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनचे सहसचिव मकरंद कोऱ्हाळकर यांनी मानले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे