आपला जिल्हा

 के. जे. सोमैया महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

 के. जे. सोमैया महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

संविधानिक मूल्यांचा अंगीकार करून जबाबदार नागरिक बना – प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांचे आवाहन

Kopargaon vijay kapse दि २६ नोव्हेंबर २०२६-कोपरगाव  येथील के. जे. सोमैया महाविद्यालयात भारतीय संविधान दिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) विजय ठाणगे होते.

जाहिरात

कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने करण्यात आली. प्रास्ताविकात प्रो. (डॉ.) एस. एम. देवरे यांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीचा इतिहास विशद करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेच्या सदस्यांनी संविधान निर्मितीसाठी घेतलेल्या अथक परिश्रमांचा गौरव केला.

जाहिरात

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रो. (डॉ.) विजय ठाणगे यांनी भारतीय राज्यघटनेचे महत्त्व आणि वर्तमान काळातील तिची उपयुक्तता अधोरेखित केली. ते म्हणाले, भारतीय संविधान हा जगातील सर्वात मोठा आणि सर्वसमावेशक लिखित दस्तऐवज असून, त्याने प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांची हमी दिली आहे. केवळ मूलभूत हक्कांची मागणी न करता प्रत्येक नागरिकाने, विशेषतः तरुण पिढीने आपल्या संवैधानिक कर्तव्यांचेही प्रामाणिकपणे पालन करणे आवश्यक आहे.

जाहिरात

देशाची लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी विद्यार्थ्यांनी संविधानाचा सखोल अभ्यास करावा, संवैधानिक मूल्यांचा अंगीकार करावा आणि जबाबदार व सुजाण नागरिक बनावे, असे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमास कला विभागप्रमुख प्रो. डॉ. जे. एस. मोरे, वाणिज्य विभागप्रमुख प्रो. डॉ. एस. आर. पगारे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख प्रो. डॉ. जी. एस. शिंदे, प्रा. एस. एस. नागरे, प्रा. परीक्षित जाधव, प्रा. आदित्य देशमुख, प्रा. प्रवीण मोरे, कार्यालयीन अधीक्षक डॉ. अभिजित नाईकवाडे, आबासाहेब कोकाटे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. एस. गायकवाड यांनी केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे