विरोधकांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवर राजकीय दबाव टाकून प्रसिद्धीपत्रक काढले
कवी अनंत फंदी नाट्यगृहाचे लोकार्पण दुष्काळामुळे साध्या पद्धतीने संपन्न; कोणतेही योगदान नसलेल्यांचे आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा प्रयत्न; गटनेत्या दिपाली पांचारिया

कवी अनंत फंदी नाट्यगृहाच्या लोकार्पण बाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात गटनेत्या सौ दिपाली पांचारिया यांनी म्हटले आहे की, संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने उभारलेले कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह हे अत्याधुनिक व अद्यावत झाले आहे. हे नाट्यगृह शहराबरोबर संगमनेरच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणारे आहे.1000 आसन क्षमता असलेले हे नाट्यगृह तालुकास्तरावरील मोठे नाट्यगृह ठरले आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे संगमनेर मध्ये अद्यावत नाट्यगृह व क्रीडा संकुल व्हावे हे स्वप्न होते .2011 मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे यांच्या कार्यकाळात कार्यकाळात बंदिस्त नाट्यगृहासाठी पाठपुरावा सुरू झाला. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने या कामाला शासकीय स्तरावर मोठी मदत केली. यानंतर आमदार सत्यजित तांबे यांनी नगर विकास विभाग, सांस्कृतिक विभाग व मराठी भाषा विभाग यांच्याकडे ही सातत्याने या नाट्यगृहाच्या उभारणीसाठी पाठपुरावा केला.

याचबरोबर अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्या भेटी घडून आणल्या. मंत्री उदय सामंत यांनीही भेट दिली. त्यानंतर विविध विभागातून निधी मिळून हे अद्यावत नाट्यगृह उभे राहिले आहे.
यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने लोकार्पण हे अत्यंत साध्या पद्धतीने व्हावे. ही सर्व नगरसेवक व नगरसेविका यांची इच्छा होती. यानुसार अत्यंत साध्या पद्धतीने हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. याचबरोबर सुरुवातीला दोन नाट्यप्रयोगाचे आयोजन करून यामधून मिळालेल्या 3 लाख 33 हजार 333 रुपयांचा निधी सुद्धा दुष्काळ निधीला दिला जाणार आहे.

या नाट्यगृहाचा जिल्हा व राज्यात गौरव झाल्याने विरोधकांना पोटशुळ उठला आहे. ज्यांचे या कामांमध्ये कोणतेही योगदान नाही असे लोकप्रतिनिधी व त्यांच्या समर्थकांनी राजकीय दबाव वापरून मुख्याधिकाऱ्यांना पत्रक देण्यास भाग पाडले. नेहमीप्रमाणे कोणतेही काम न करणे फक्त राजकारण करणे आणि अडवणूक निर्माण करणे हा त्यांचा उद्योग सुरूच आहे. हे अत्यंत चुकीचे आणि दुर्दैवी आहे. खरे तर आता पूर्णपणे या नाट्यगृहाचे लोकार्पण संपन्न झाले असून त्यामध्ये विविध कार्यक्रम सुरू झाले आहे. कवी अनंत फंदी व्याख्यानमाला सुद्धा आता आज सुरू होत आहे.
संगमनेर नगर परिषदेने विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना निमंत्रित केले आहे
नगरपालिकेच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योग मंत्री उदय सामंत यांची याबाबत भेट घेतली असून ती लवकरच उद्घाटनाची तारीख कळवणार आहे.
त्यामुळे कोणतीही काम न करता फक्त फ्लेक्स बाजी करणे, श्रेय घेण्याचा प्रयत्न करणे असे चुकीचे प्रयत्न करणाऱ्या लोकप्रतिनिधी व त्यांच्या मंडळींनी राजकीय दबाव टाकून मुख्याधिकाऱ्यांना पत्र काढण्यास भाग पाडले . त्यांनी हे राजकारण थांबवावे असे आवाहन ही त्यांनी केले आहे

दुष्काळ निधीसाठी 3 लाख 33 हजार 333 रुपये देणार
महाराष्ट्रात यावर्षी मोठी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून संगमनेर शहर व तालुका अशा परिस्थितीमध्ये कायम नुकसानग्रस्तांच्या पाठीशी उभा राहिला आहे. दुष्काळग्रस्त नागरिकांना मदत व्हावी या उद्देशाने संगमनेर नगर परिषदेने अत्यंत साध्या पद्धतीने अत्याधुनिक कवी अनंत संधी नाट्यगृहाचे लोकार्पण केले असून दुष्काळ निधीसाठी आयोजित केलेल्या दोन नाट्यप्रयोगांमधून जमा झालेली 3 लाख 33 हजार 333 रुपये ही रक्कम दुष्काळ निधी जमा होणार आहे.
कोणतीही योगदान नसलेल्यानी आयत्या पिठावर रेघोट्या मारू नये
संगमनेर नगरपरिषदेने अद्यावत नाट्यगृह उभारले आहे.2011 पासून यासाठी काम सुरू होते. माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांनी यासाठी सातत्याने विशेष प्रयत्न केले. हे सर्वश्रुत आहे. मात्र ज्यांचे कोणतेही योगदान नाही त्यांनी आयत्या पिठावर रेघोट्या मारू नये अशी भावना ही आता संगमनेर मधील नाट्यप्रेमी व सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रित करणार
संगमनेर नगर परिषदेचे विविध विकास कामांचे उद्घाटन बाकी आहे. याकरता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना निमंत्रित केले असून त्यांची वेळ मिळाल्यानंतर नगरपरिषदेच्या विविध विकास कामांचे लोकार्पण केले जाणार असल्याचेही दिपाली पांचारिया यांनी सांगितले आहे.



