संगमनेर

काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यास गरीब कुटुंबातील महिलांना १ लाख रुपये – डॉ.जयश्रीताई थोरात

काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यास गरीब कुटुंबातील महिलांना १ लाख रुपये – डॉ.जयश्रीताई थोरात

 

देशातील महागाई व बेरोजगारीला भाजप जबाबदार – डॉ. जयश्रीताई थोरात;

वाकचौरे यांच्या प्रचारार्थ विविध गावांमधून बैठकांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद

संगमनेर प्रतिनिधी दि ५ मे २०२४प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये, दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या ही खोटी आश्वासने भाजप सरकारने दिली. उलट अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. महागाई भरमसाठ वाढली, महिला असुरक्षित झाल्या. या सर्वांना भाजप सरकार जबाबदार असून इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास गरीब कुटुंबातील महिलांना एक लाख रुपये वार्षिक मिळणार असल्याचे प्रतिपादन युवक काँग्रेसचे अध्यक्ष कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले आहे.

जाहिरात

महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ निमज, चिकणी, राजापूर, निमगाव भोजापूर, खांडगाव, रायते या विविध गावांमधून त्यांनी घोंगडी बैठकांमधून मतदारांना आवाहन केले यावेळी समवेत जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, संपतराव डोंगरे, संतोष हासे,प्रदीप हासे, आनंद वरपे, अरुण गुंजाळ, सागर डोंगरे, राष्ट्रवादीचे वसंतराव पवार, चंद्रकांत घुले, सुरभी मोरे, भारत वर्पे, सावळेराम खतोडे, भाऊसाहेब हासे,आदींसह विविध कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

यावेळी बोलताना डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, सध्या महागाई भरमसाठ वाढली आहे. डिझेल पेट्रोल 100 रुपयाच्या पुढे गेले आहे. तर गॅस हजार रुपयांच्या पुढे आहे. भाजप सरकारने नोकऱ्या निर्माण केल्या नाही. फक्त तरुणांना दीड जीबी डाटा विकत दिला. आणि त्यामध्ये अडकवून ठेवले त्यामुळे अनेकांना आपली बेरोजगारी कळत नाही. मोबाईल मध्ये अडकलेल्या युवक जेव्हा बाहेर पडला तेव्हा त्याला बेरोजगारी कळाली असून त्यामुळे देशांमध्ये या सरकार विरोधात मोठी लाट निर्माण झाली आहे. धर्माचे मुद्दे पुढे करून तरुणांची डोकी भडकवली जात आहे. परंतु देर आहे दुरुस्त आहे सर्व तरुणाई आता भाजपाच्या विरोधी झाली असून आगामी काळात इंडियाचे सरकार सत्तेवर येणार आहे.

जाहिरात

काँग्रेसने कायम सर्व समावेशक राजकारण केले सर्व जाती धर्मांना न्याय दिला. काँग्रेसच्या न्याय या जाहीरनामातून गरीब कुटुंबातील महिलांना दरवर्षाला एक लाख रुपये मिळणार आहे. याचबरोबर सर्वांचे हक्क आबाधित राहणार असून आपली लोकशाही अधिक बळकट होणार आहे. तेव्हा कोणत्याही भूलथापांना बळी न पडता तरुण नागरिक व महिलांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.
तर कातोरे म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्ह्यामध्ये दोन्ही उमेदवार महाविकास आघाडीची निवडून येणार आहे.भाऊसाहेब वाकचौरे यांनी कायम जनतेच्या संपर्कात राहून काम केल्याने ते जनतेचे उमेदवार ठरत असल्याचे ते म्हणाले. यावेळी संपतराव डोंगरे, प्रदीप हासे, अरुण गुंजाळ,आनंद वरपे यांनी ही भाषणे केली.यावेळी वाडी वस्तीवरील नागरिक महिला युवक कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

गावागावातून भाऊसाहेब वाकचौरे यांना मोठा प्रतिसाद

खासदारकीच्या काळामध्ये भाऊसाहेब वाकचौरे यांनी अनेक गावांमधून सभा मंडप दिले आहे. याचबरोबर सातत्याने संपर्क ठेवला आहे. या उलट विद्यमान खासदार कधी चमकले सुद्धा नाही त्यामुळे प्रत्येक गावातील नागरिक हा भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पाठीशी असून शिर्डी मतदारसंघातून वाकचौरे हे मोठ्या मतदार मताधिक्याने विजय होतील असेही डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे