रविवारी संगमनेरमध्ये भव्य जंगी कुस्त्यांचे आयोजन
आद्य क्रांतिवीर उमाजी राजे नाईक जयंती निमित्ताने महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर व पृथ्वीराज पाटील यांची कुस्तीमाजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य जयंती साजरी होणार

संगमनेर विजय कापसे दि १ ऑक्टोबर २०२५—सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन सर्वांच्या विकासासाठी सातत्याने काम करणारे लोकनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या 234 व्या जयंतीनिमित्त रविवार दिनांक 5 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 4 ते 8 वाजेपर्यंत यशोधन मैदान येथे भव्य जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर व पृथ्वीराज पाटील सहभागी होणार आहेत.

आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या 234 व्या जयंती निमित्ताने रविवार दिनांक 5 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 4 ते 8 वाजेपर्यंत लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयाजवळील मैदानावर भव्य जंगी कुस्त्यांचे आयोजन होणार आहे. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे , मा आमदार डॉ. सुधीर तांबे,आमदार सत्यजित तांबे, युवा काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ जयश्रीताई थोरात, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अजय फटांगरे, कुस्तीचे मार्गदर्शक आंतरराष्ट्रीय पदक विजेते तानाजी नरके व कुस्ती निवेदक हंगेश्वर धायगुडे उपस्थित राहणार आहेत.

या जंगी कुस्तीमध्ये प्रथम बक्षीस 3 लाख 11 हजार असून या बक्षिसासाठी महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर (कोंभाळणे) व महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील (कोल्हापूर) यांची लढत होणार आहे. तर दुसरे बक्षीस 2 लाख 51 हजार साठी बाळू अपराध (सांगली) व समीर शेख (सोलापूर ) यांच्यात लढत होणार आहे. तिसरे तिसरे बक्षीस 2 लाख रुपये करतात शाहरुख खान (हनुमान आखाडा पुणे) व विजय वारा (विदर्भ केसरी वाशिम ) यांच्यात लढत होणार आहे. चतुर्थ बक्षीस 1 लाख 50 हजार रुपये करता विशाल मांगे (पुणे) व भारत फुलमाळी (कुर्डूवाडी) यांच्यात लढत होणार आहे. पाचवे बक्षीस 1 लाख रुपये अनिल कोकणी (इगतपुरी) व हर्षल लोमटे (पुणे) यांच्यात लढत होणार आहे. सहावे बक्षीस 71000 हजार रुपये विनोद सालकर (अकोले) व सुनील जाधव (पुणे) यांच्यात लढत होणार आहे. सातवी बक्षीस 51 हजार रुपये शुभम लांडगे (वडगाव लांडगा) व पवन सूर्यवंशी (सिन्नर) यांच्यात लढत होईल तर आठवी बक्षीस 41 हजार रुपये कुमार देशमाने (भाळवणी) व रोशन मोहिते (साकुर फाटा) यांच्यात लढत होईल नववे बक्षीस 31000 रुपये विशाल तरंगे (मांडवे) व हर्षद तोकडे (सिन्नर) यांच्यात लढत होईल तर दहावे बक्षीस 21000 हजार रुपये प्रवीण गिरी (कळस) व रोहित करवंदे (साकुर फाटा ) यांच्यामध्ये लढत होईल.

या सर्व लढती सर्वांसाठी खुले असून जास्तीत जास्त नागरिक व युवकांनी या जंगी कुस्त्यांसाठी उपस्थित रहावे असे आवाहन आद्य क्रांतिकारक उमाजी राजे नाईक जयंती उत्सव समिती संगमनेर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सुप्रसिद्ध स्वर सम्राट बँडमहाराष्ट्रात गाजत असलेला सुप्रसिद्ध सटाणा येथील स्वर सम्राट बँड या कुस्त्यांसाठी असणार असून दुपारी बारा ते तीन या वेळेमध्ये संगमनेर शहरात आद्य क्रांतिकारक उमाजी राजे नाईक यांची भव्य मिरवणूक होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज ते यशोधन प्रांगण या ठिकाणी ही मिरवणूक होणार असून या मिरवणुकीमध्येही सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.



