करंजी बु
करंजी शाळेतील विद्यार्थ्यांमार्फत उन्हाळ्यात पक्षांना पाण्याची आणि अन्नाची सोय

कोपरगाव विजय कापसे दि २८ मार्च २०२४– रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर शंकररावजी काळे माध्यमिक विद्यालय, करंजी बु. ता. कोपरगाव येथील विद्यार्थ्यांमार्फत उन्हाळ्यात पक्षांना पाण्याची आणि अन्नाची टंचाई भासू नये म्हणून पक्षी संरक्षण मोहीम चालू करण्यात आलेली आहे. विद्यालयातील उपशिक्षक ललित प्रकाश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास ४० ते ५० विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे.


