नको पाणी पंचमी, साजरी करू कोरडी रंगपंचमी आकाश नागरे यांचे कोपरगावकरांना आवाहन
नको पाणी पंचमी, साजरी करू कोरडी रंगपंचमी
आकाश नागरे यांचे कोपरगावकरांना आवाहन
नको पाणी पंचमी, साजरी करू कोरडी रंगपंचमी
आकाश नागरे यांचे कोपरगावकरांना आवाहन
कोपरगाव विजय कापसे दि ३० मार्च २०२४ – आज कोपरगाव सह इतर जिल्ह्यांत , तालुक्यात परिसरात रंगपंचमी साजरी केली जाणार आहे. यावर्षी असणारी पाणीटंचाई परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा अपव्यय करू नये. शक्यतो कोरड्या व नैसर्गिक रंगांचा वापर करून रंगोत्सव साजरा करावा, असे आवाहन कोपरगाव तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांनी केले आहे.
दरवर्षी शहरासह तालुक्यात रंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रंग खेळताना पाण्याचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अनेक ठिकाणी सार्वजनिकरित्या रंगपंचमी साजरी केली जाते. अशा पद्धतीने रंगपंचमी साजरी करताना पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अनेक ठिकाणी पाण्याचे टँकरच उभे केले जातात.
पाऊस कमी झाल्यामुळे भुगर्भातील पाणीपातळी वाढली नाही. परिणामी शहरातील विंधन विहीरींनाही मर्यादित पाणी उपलब्ध आहे. अनेक विंधन विहीरी बंद पडत आहेत. गरजेपेक्षा अधिक वापर किंवा पाण्याचा अपव्यय झाला तर भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी रंग खेळताना पाण्याचा वापर करू नये. अनावश्यक पाणी वापरू नये. रंगात पाणी मिसळण्याऐवजी कोरडे व नैसर्गिक रंग वापरावेत, असे आवाहन कोपरगाव तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांनी केले आहे.