देशाला समृद्ध करण्यासाठी एकजुटीने उभे राहण्याची आवश्यकता : स्नेहलताताई कोल्हे
कोपरगावतील स्नेहलताताई कोल्हे यांच्या कार्यालयात भाजपा स्थापना दिवस उत्साहात साजरा
कोपरगाव विजय कापसे दि ६ एप्रिल २०२४– देशाला जगाचा विश्वगुरु बनविण्यासाठी, राष्ट्राच्या हितासाठी आणि समृद्ध भारत घडविण्यासाठी पुन्हा एकदा जगातील लोकप्रिय व्यक्तिमत्व नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर श्रद्धा आणि विश्वास ठेवून त्यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी एकजुटीने एक शक्तीने त्यांच्यापाठिशी उभे राहून आपलं उज्ज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी एक दिलाने उभे रहा असे आवाहन कोपरगाव मतदार संघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी केले.
भाजपा दिवस निमीत्ताने कोपरगावातील जनसंपर्क कार्यालयात बोलत होत्या. प्रथम वंदन भारत मातेला करीत स्व. शामा प्रसाद मुखर्जी, स्व. पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जनसंपर्क कार्यलयात भाजपाचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष कैलास रहाणे, भाजपा शहराध्यक्ष डी. आर.काले, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष अमोल गवळी, भाजयुमोचे शहराध्यक्ष सिद्धार्थ साठे, शरद नाना थोरात, साहेबराव रोहोम, विक्रम पाचोरे, पराग संधान, दिलीप घोडके, हरिभाऊ गिरमे, महावीर दगडे, नरेंद्र डंबीर, सुरेश विसपुते, रवींद्र पाठक, हरिभाऊ लोहकणे, कैलास खैरे, गोपीनाथ गायकवाड, भीमा संवत्सरकर, उत्तमराव चरमळ, आदींसह मान्यवर उपस्थित होते.
पुढे सौ.कोल्हे म्हणाल्या की, जनसंघापासून सुरू झालेला प्रवास आज जगातील एक नंबरचा भाजपा पक्ष झाला आहे. या प्रवासात पक्षाच्या जेष्ठ कार्यकर्त्यांनी तो त्याग आणि बलिदान दिले आहे. त्यांच्या बलिदानाचे कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे भाजपा स्थापना दिवस होय. यामध्ये स्व. शामाप्रसाद मुखर्जी व पंडित दीन दयाळ उपाध्याय योगदान खुप मोठे आहे. देशातील शेवटचा घटक सुखी झाला पाहिजे यासाठी आयुष्य खर्च केले. त्याच्याबद्दल खऱ्या अर्थाने कृतज्ञतेचा दिवस आहे. केंद्रात दोनच खासदार असल्यापासून सुरू झालेला प्रवास आज ३००च्या पार आपण पोहचलो आहोत. भाजपा हा पक्ष सक्षम, समृद्ध, सामर्थ्यशाली, स्वावलंबी भारत निर्माण करण्यासाठी सक्रीय आहे. जगाच्या स्पर्धेत आपण टिकलो पाहिजे यासाठी देशाचे लोकप्रिय नेतृत्व नरेंद्र मोदी याचे एक स्वप्न आहे की, हिंदु प्राचीन संस्कृतीत असणारे संस्कार, सभ्यता ह्या जगाला देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जी राज्य घटना, संविधान दिले आहे. हे संविधान देशाचा आत्मा आहे. त्यासअनुसरून देशाची सेवा करायची आहे. निश्चितच हा जगापुढे वेगळा आदर्श आहे. समा ज्याला परिवार मानून काम करणारे ही लोक आहेत. कोरोनात जे काम मोदिनी केले. या संकटकाळात मोदिजी उभे राहिले एक व्यक्ति भुकेने जाऊ दिल नाही. याकाळात तालुक्यात विवेक भैय्या कोल्हे आणि युवा कार्यकर्त्यांची फळी उभी राहिली. कोरोंना सेंटर उभारले. संजीवनी उद्योग समूहाने महत्वपूर्ण योगदान दिले. बचतगटाच्या मध्यमातून मास्क दिले. पूर परिस्थितीत संजीवनी उद्योग समूह उभा राहीला.
आपण सत्तेत असो नसो आपण कायम कार्यरत असणारा आमचा परिवार आहे, ही शिकवण स्व.कोल्हे साहेबांची आहे. सत्ता नाही म्हणून आम्ही थांबलो नाही. पोटात एक आणि ओठात एक असे कधीही वागलो नाही, म्हणून भाजपाचा आमच्या कार्यावर प्रचंड विश्वास आहे.म्हणून पक्षनेतृत्व आमच्या पाठीशी उभे राहते. जेष्ठ कार्यकर्त्यांनी योगदान दिले त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा कार्यक्रम आहे.
स्व. कोल्हे साहेबांनी असे कार्यकर्ते तयार केले जे आजही विवेकभैय्या कोल्हे सोबत काम करतात. त्याच उत्तम उदाहरण गणेश कारखान्याची निवडणूक होती. त्या निवडणुकीची चर्चा राज्यात झाली. त्या निवडणुकीतील जेष्ठांनी विश्वास कोल्हे साहेबांवर ठेवला तोच विश्वास विवेकभैय्या कोल्हेवर ठेवला. जो विश्वास आमच्या कोल्हे परिवारावर आहे तोच विश्वास भाजपावर आहे, आपल्या सेवे साठी आम्ही कायम आहोत अशी ग्वाही माजी आमदार स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी दिला.
याप्रसंगी भाजपाचे सतीश गायकवाड, नारायण गवळी, सादिक पठाण, रुपेश सिनगर, वसीम पटेल, राजेंद्र बागुल, हाजी फकीर मोहम्मद, जयप्रकाश आव्हाड, सचिन सावंत, खालीक कुरेशी, लचकभाई सय्यद, सतीश रानोडे, अनिल जाधव, शंकर बिऱ्हाडे, संतोष साबळे, विनोद चोपडा, दीपक राऊत, नवनाथ आरणे, दीपक जपे, गोरख देवडे, प्रकाश दवंगे, मनोज इंगळे, लक्ष्मीकांत संवत्सरकर, सलीम पठाण, नारायण मोरे, मुख्तार शेख, मनोज तुपे, गोपीनाथ गायकवाड, रहीम शेख, एस.बी. शेख, ज्ञानेश्वर रोकडे, संदीप निरभवणे, साईनाथ मंडलिक, विकास गायकवाड, रोहिदास पारखे, शिरीष राजपूत, शाम आहेर, जगदीश मोरे, रावसाहेब मोकळ, प्रशांत वाबळे, कानिफनाथ गुंजाळ, नानासाहेब होन, निखिल औताडे आदीसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.