करंजीत हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत साजरी केली इफ्तार पार्टी
करंजीत हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत साजरी केली इफ्तार पार्टी
हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन
कोपरगाव विजय कापसे दि ६ एप्रिल २०२४– सध्या मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू असून या पर्वकाळात संपूर्ण देशभरातील मुस्लिम बांधव अत्यंत कडक उपवास करत असतात आणि हेच पवित्र उपवास सोडवण्यासाठी संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येत असते त्याच अनुषंगाने कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजानचा उपवास सोडवण्यासाठी जामा मस्जिद ट्रस्ट करंजी व आशरफ इनामदार यांच्यावतीने हिंदू मुस्लिम बांधवानी एकत्र येत इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी करंजी गावचे सरपंच रवींद्र आगवण, उपसरपंच शिवाजी जाधव, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक संजय आगवन, चांगदेव आगवण, माजी सभापती नवनाथ आगवन, आप्पासाहेब आगवन, बंडू आगवन, गोरख भिंगारे, बाबासाहेब आगवण, देविदास भिंगारे, अरुण भिंगारे, लक्ष्मण भिंगारे, पंकज फापाळे, सुभाष चरमळ, गणेश जोर्वेकर, रोहित शेळके, बाबासाहेब कापसे, मौलाना मोहसीन पठाण, बशीर शेख, बाबूलाल शेख, हाजी बनेमिया शेख, हारून शेख, राजू बनेमिया शेख, जाहिद शेख, अल्ताफ शेख, अश्फाक शेख, आकील शेख, मनेखा पठाण,
मुनीर पठाण, सिकंदर शेख, सलीम हैदर शेख, रज्जाक शेख, मदेखा पठाण, राजू करीम शेख, जमील सांडू शेख, कलीम पटेल, मुनीर शेख, सुलतान शेख, भैय्याउस्मान शेख, तोफिक शेख, बशीर शेख, कयूम शेख, अखिल शेख, हुसेन शेख, अशपाक इनामदार, अकबर शेख ,अल्ताफ इनामदार, सलीम शेख, मुनीर पठाण, अर्षद सय्यद, सिकंदर शेख, अल्ताफ शब्बीर शेख, आसिफ पटेल, मुनीर शेख, मुनीर पप्पू शेख, अमन शेख, निसार पटेल, अशपाक मणियार, सलीम शेख, लाला शेख,असलम शेख, जाकीर शेख, सांडूअब्दुल शेख, रशीद पटेल, इकबाल पटेल, नादीम पटेल, रज्जाक शेख, रज्जाक पठाण, उमर शेख, सलीमभाई शेख आदि सह सर्व धर्मीय ग्रामस्थ मोठया संख्येने इफ्तार पार्टी साठी उपस्थित होते.