काळे गट

कोल्हे गटाच्या माजी उपनगराध्यक्षासह कार्यकर्त्यांची कोल्हेंना सोडचिठ्ठी; आ. आशुतोष काळेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

कोल्हे गटाच्या माजी उपनगराध्यक्षासह कार्यकर्त्यांची कोल्हेंना सोडचिठ्ठी; आ. आशुतोष काळेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांचा प्रवेश
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ६ एप्रिल २०२४ :- संपूर्ण देशात लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरु असतांना कोल्हे गटाला मात्र कोपरगाव शहरात मोठा धक्का बसला असून कोल्हे गटाच्या माजी उपनगराध्यक्षांसह नगरसेवक व कार्यकर्त्यांनी शनिवार (दि.०६) कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या जयंतीचे औचित्य साधत आ. आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

जाहिरात

एकीकडे लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु आहे मात्र कोपरगाव शहरात भाजपच्या कोल्हे गटाच्या विश्वासू कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घड्याळ हाती बांधले आहे. त्यामुळे कोपरगाव शहरात कोल्हे गटाला मोठे खिंडार पडले असून आ. आशुतोष काळेंनी कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याबरोबरच शहराच्या केलेल्या स्वप्नवत विकासामुळे विरोधी गटाचे प्रमुख कार्यकर्ते देखील आ. आशुतोष काळेंच्या कामगिरीवर खुश झाले असल्याचे दिसून येत आहे.

जाहिरात
प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये कोल्हे गटाचे माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे,नगरसेवक बाळासाहेब आढाव, तसेच उल्हास पवार, सुरेश पवार, ओम आढाव, ऋषिकेश आढाव, नवनाथ बढे या कार्यकर्त्यांचा समावेश आहे.या सर्व कार्यकर्त्यांचा आ. आशुतोष काळे यांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेशाबाबत प्रतिक्रिया देतांना माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे म्हणाले की, मनापासुन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. आजपासूनच प्रामाणिक कामास प्रारंभ करणार असून आम्हाला जीव लावा तुमच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही अशा भावना व्यक्त केल्या.   
याप्रसंगी आ. आशुतोष काळे ते म्हणाले की, विकासाला विरोध करायचा नाही हि विचार सरणी डोळ्यासमोर ठेवून कोपरगाव नगरपरिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची संख्या कमी असतांना देखील विरोधाला विरोध न करता नेहमीच शहर विकासाला प्राधान्य दिले आहे हे कोपरगावकरांनी पहिले आहे अनुभवले आहे. विकासाच्या वाटेवर वाटचाल करीत असतांना विकासाला निधी कमी पडू दिला नाही त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा महत्वाचा प्रश्न मार्गी लागला आहे व कोपरगाव शहराचा देखील विकास झाला आहे.कोपरगाव शहराच्या विकासासाठी विरोधी पक्षाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करीत आहेत हि समाधानाची बाब असून त्यामुळे शहर विकासाला चालना देण्यासाठी त्यांचे सहकार्य मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे, महात्मा गांधी जिल्हा चरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, जिल्हा युवक अध्यक्ष कृष्णा आढाव, अशोक आव्हाटे, आदी मान्यवरांसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे