श्री साईबाबा कॉर्नर येथे होणारे जल कुंभास शुक्राचार्य महाराजांचे नाव देण्याची मागणी
श्री साईबाबा कॉर्नर येथे होणारे जल कुंभास शुक्राचार्य महाराजांचे नाव देण्याची मागणी
मुख्याधिकारी यांना निवेदन देत केली मागणी

कोपरगाव विजय कापसे दि ७ एप्रिल २०२४- कोपरगाव शहरात साईबाबा कॉर्नर येथील पाणी फिल्टरेशन प्लांट जवळ होत असलेल्या जल कुंभास परम सद्गुरू शुक्राचार्य महाराजांचे नाव द्यावे अशी मागणी शुक्राचार्य ट्रस्टच्या वतीने कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांना निवेदन केली आहे.

कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदी किनारी वसलेले जगातील एकमेव मंदिर जिथे कोणतेही शुभ कार्य करण्यास मुहूर्त पहावा लागत नाही अशी ख्याती असलेल्या परम सद्गुरु शुक्राचार्य महाराजांचा नावाने कोपरगाव शहरात काहीच दिसून येत आहे अशी खंत अनकेदा भक्तांकडून व्यक्त केली जात असल्याने श्री साईबाबा कॉर्नर येथे होत असलेल्या नवीन जलकुंभास परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज जलकुंभ असे नाव देण्यात यावे अशी मागणी कोपरगाव ग्रामस्थांच्या व भक्तांच्या वतीने शुक्राचार्य मंदिर ट्रस्टच्या वतीने कोपरगाव नगरपरिषदेला निवेदन देत केली आहे.

