संगमनेर

रमजान ईद हा बंधू भावाचा व मानवतेचा संदेश देणारा सण – आमदार थोरात

रमजान ईद हा बंधू भावाचा व मानवतेचा संदेश देणारा सण – आमदार थोरात
संगमनेरात रमजान ईद व महात्मा फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी

संगमनेर विजय कापसे दि ११ एप्रिल २०२४रमजान ईद हा पवित्र सण एक महिन्याच्या उपवासानंतर येतो. जगामध्ये मुस्लिम बांधव मोठ्या आनंदाने आणि पवित्र भावनेने हा सण साजरा करत असतात. एकता ही भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य असून रमजान ईद हा बंधुभावाचा संदेश देणारा सण असल्याचे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

जाहिरात

ईदगाह मैदान येथे रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देताना ते बोलत होते यावेळी समवेत मा.आमदार डॉ.सुधीर तांबे,आ.सत्यजित तांबे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष कॅन्सर तज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात, गणेश मादास, किशोर टोकसे ,सोमेश्वर दिवटे, नितीन अभंग, गजेंद्र अभंग, बाळासाहेब पवार, निखिल पापडेजा ,गौरव डोंगरे, अभय खोजे, लुकड्या पहिलवान, सुरेश झावरे, शकील पेंटर, लाला बेपारी, जावेद शेख आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

यावेळी शुभेच्छा देताना आमदार थोरात म्हणाले की, उपवास हा परमेश्वराच्या जवळ जाण्याचा मार्ग आहे. उपवासाने जीवनातील पवित्रता वाढते. रमजान महिना हा आनंददायी व प्रेरणा देणारा आहे. भारतीय संस्कृतीमध्ये विविधता असून सर्व धर्म समभावामुळे सर्व नागरिक एकमेकांचे सण आनंदाने साजरे करतात. रमजान ईद हा सन संपूर्ण जगामध्ये मोठ्या आनंदाने व उत्साहाने मुस्लिम बांधव साजरा करत असून बंधू भावाचा प्रेमाचा आणि मानवतेचा संदेश देणारा हा सण असल्याचे ते म्हणाले.

तर मा.आ.डॉ.तांबे म्हणाले की, रमजान ईद हा सन जगासह भारतात मोठ्या आनंदाने साजरा करतात .यानिमित्त महिनाभर उपवास केले जातात. ईश्वराजवळ राहण्याचा उपवास हा मार्ग असून अंतकरणाच्या शुद्धीसाठी पवित्र उपवास केले जातात.रमजान ईद निमित्ताने सर्व बांधवांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. तर आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, मानवता हाच धर्म असून सर्वांनी एकत्र येऊन सण साजरे केल्याने आनंद द्विगुणीत होतो. तर कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, एकात्मता ही भारतीय संस्कृतीची मोठी ताकद असून सर्वजण एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने सन साजरे करत आहेत. यावेळी संगमनेर शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी सर्व मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे