आत्मा मालिक येथे भारतीय खेल प्राधिकरण (SAI) तर्फे मल्लांची भरती- नंदकुमार सूर्यवंशी
आत्मा मालिक येथे भारतीय खेल प्राधिकरण (SAI) तर्फे मल्लांची भरती- नंदकुमार सूर्यवंशी
कोपरगाव विजय कापसे दि १५ एप्रिल २०२४– सोमवार दिनांक २९ ते मंगळवार दिनांक ३० एप्रिल २०२४ या कालावधीत भारतीय खेल प्राधिकरण यांच्या वतीने आत्मा मालिक कुस्ती केंद्र, कोकमठाण येथे नवीन मल्लांची भरती प्रक्रिया घेण्यात येणार असून त्यासाठीची निवड चाचणी ही आत्मा मालिक कुस्ती केंद्र, कोकमठाण या ठिकाणी आयोजित केली गेली असल्याची माहिती विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांनी दिली आहे.
या विषयी सूर्यवंशी यांनी अधिक माहिती देतांना सांगितले की, भारतीय खेल प्राधिकरणाच्या वतीने ही निवड चाचणी प्रक्रिया होणार असून शासकीय कुस्ती कोच रुपेंदर पूनिया व आत्मा मालिक कुस्ती केंद्राचे संचालक एन आय एस, राष्ट्रीय कुस्ती पंच भरत नायकल यांच्या उपस्थितीत व निर्दशनाखाली ही निवड चाचणी प्रक्रिया पार पडणार आहे.
आत्मा मालिक कुस्ती केंद्राला २००६ पासून साईची मान्यता आहे. आजपर्यंत आत्मा मालिकमधून ४ विदयार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभाग नोंदवून पदके मिळविली आहेत. साई मार्फत आयोजित केलेल्या या निवड चाचणी प्रकियेकरीता वय वर्षे १० ते १६ वयोगटातील नवीन मल्लांची भरती केली जाणार आहे. निवड चाचणी प्रक्रियेतुन निवड झालेल्या मल्लांना आत्मा मालिक कुस्ती केंद्र, कोकमठाण येथे प्रशिक्षणासाठी राहणे अनिवार्य आहे. असे आत्मा मालिक कुस्ती केद्रांचे संचालक भरत नायकल यांनी सांगितले.
आवश्यक कागदपत्रेया निवड चाचणी प्रक्रियेला येते वेळी मल्लांनी जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळेचा बोनाफाईड, आधार कार्ड, चार पासपोर्ट साईज फोटो, स्वतःचे बँक पासबुकआदी सर्व कागदपत्रांची मूळ प्रत व झेरॉक्स सोबत येताना आणावीत.