आत्मा मलिक हॉस्पिटल

येवला गुरुकुलात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

येवला गुरुकुलात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

येवला गुरुकुलात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

येवला प्रतिनिधी दि २१ जुन  २०२४आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येवला येथे अध्यक्ष हनुमंत भोंगळे यांच्या मार्गदर्शनातून व प्रेरणेतून आंतरराष्ट्रीय योग दिवस जागतिक संगीत दिवस आणि चौदस साजरी करण्यात आली.

जाहिरात

याप्रसंगी प्राचार्य तुषार कापसे व सर्व शिक्षक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रतिमापूजन व संगीत साहित्य पूजन करण्यात आले. चौदस निमित्त १० वी च्या विद्यार्थ्यांनी सद्गुरु आत्मा मालिक माऊली यांचे भजन गायले. तर वेदिका आहेर, शार्वी लग्गड,आदेश शेलार या विद्यार्थ्यांनी योगा दिनानिमित्त माहिती सांगितली.

जाहिरात

तसेच योग दिनानिमित्त गुरुकुलातील सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी योगा डेमो सादर केला. सौ अनुराधा जोरी यांनी योगा दिनानिमित्त माहिती सांगितली व संगीत शिक्षक प्रथमेश परजने यांनी संगीत दिनानिमित्त माहिती सांगितली. योग दिनानिमित्त सूर्यनमस्कार, वृक्षासन, ताडासन, अनुलोम – विलोम भ्रामरी,गोमुखासन,पद्मासन आदी आसन घेण्यात आले.

जाहिरात

तुषार कापसे यांनी योगा चे फायदे सांगितले.त्यात त्यांनी सांगितले योगा हा शरीरातील प्रत्येक पेशीला बरा करण्याचा व तिची शक्ती वाढवण्याचा एक मूलमंत्र आहे. त्यामुळे तुमचे शरीर अधिक रोगप्रतिकारक बनते आणि तुमची प्रतिकारशक्ती वाढते.नियमितपणे योगाभ्यास केल्याने तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शरीराची जाणीव होण्यास मदत होईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय शिक्षिका मनीषा शिंदे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे