आत्मा मालिक गुरुकुल येवल्याचे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवीत यश
आत्मा मालिक गुरुकुल येवल्याचे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवीत यश
येवला प्रतिनिधी दि ३ जुलै २०२४– नाशिक जिल्ह्यातील येवला येथील आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुलचे सद्गुरु आत्मा मालिक माऊलींच्या कृपाशीर्वादाने इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.
गुरुकुल मधील इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत अथर्व रवींद्र कुमकर याने येवला तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे तर आर्यन गोरखनाथ ठोंबरे शहरी विभाग तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळविला आहे तसेच गुरुकुल मधील इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत नाशिक जिल्ह्यात चतुर्थ तर येवला तालुक्यात प्रथम क्रमांक अश्विन रवींद्र कुमकर याने मिळविला आहे तर ग्रामीण विभाग तालुक्यात येवला तालुक्यात द्वितीय क्रमांक मयूर गोकुळ भावसार ग्रामीण विभाग तालुक्यात यांनी मिळविला आहे तसेच नाशिक जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये गुरुकुल मधील मयुरी ज्ञानेश्वर मगर, सृष्टी स्वप्नील घोडके सुयश शिवाजी भोरकडे या विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले.
त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी ,सरचिटणीस तथा गुरुकुलाचे अध्यक्ष हनुमंतराव भोंगळे , स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य, प्राचार्य, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्व पालकांनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.