स्टार प्रचारक आ.थोरात यांचा राज्यभर प्रचाराचा झंझावाती दौरा; लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रभर सभांना उस्फुर्त प्रतिसाद
स्टार प्रचारक आ.थोरात यांचा राज्यभर प्रचाराचा झंझावाती दौरा; लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रभर सभांना उस्फुर्त प्रतिसाद
जाहिरात
संगमनेर प्रतिनिधी दि २० एप्रिल २०२४– महाराष्ट्र काँग्रेस व महाविकास आघाडीचे प्रमुख नेते असलेले काँग्रेस पक्षाचे मा.प्रदेशाध्यक्ष तथा विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांचा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यभर प्रचारासाठी झंझावती दौरा सुरू असून सर्व सभा व रॅलींना महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
जाहिरात
महाराष्ट्र विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य असलेले आमदार बाळासाहेब थोरात हे संगमनेर विधानसभा मतदारसंघातून सलग आठ वेळा विक्रमी मताधिक्याने विजयी झाले आहेत. राज्य मंत्रिमंडळात महसूल, शिक्षण, कृषी ,रोहयो, जलसंधारण,खार जमीन अशा विविध आठ विभागांची जबाबदारी अत्यंत सक्षमपणे सांभाळताना त्यांनी प्रदेशाध्यक्ष व राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य पद सांभाळले आहे. तसेच देश पातळीवर हिमाचल प्रदेश व गुजरातचे निरीक्षक म्हणून सुद्धा यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली आहे.जाहिरात
2019 मध्ये पक्षातील अनेकांनी काँग्रेस सोडल्यानंतर अत्यंत अडचणीच्या काळामध्ये प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळताना त्यांनी या निवडणुकीमध्ये 44 आमदार निवडून आणले होते. याचबरोबर राज्यांमध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापनेमध्ये अत्यंत महत्त्वाचा सहभाग राहिला होता.
जाहिरात
शांत,संयमी,अभ्यासू आणि मनमिळावू स्वभाव असलेले आमदार बाळासाहेब थोरात हे संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत लोकप्रिय नेते आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपात विविध बैठकांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे.काँग्रेस पक्षाकडून ते स्टार प्रचारक असून निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भात नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रामटेक, भंडारा, गोंदिया या ठिकाणी त्यांनी सभा घेतली आहे.
विदर्भपाठोपाठ नाशिक, शिर्डी, यानंतर पुणे येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरांमध्ये भव्य सभा घेतली.यानंतर शुक्रवारी शिर्डी येथे रॅली करून ते हेलिकॉप्टरने प्रवास करून लातूर येथील भव्य सभेस मार्गदर्शन केले. त्यानंतर पुन्हा लातूर वरून अहमदनगरला येऊन स्वाभिमान जनसंवाद यात्रेत येऊन त्यांनी जनतेशी संवाद साधला.
पुरोगामी विचार, पक्षनिष्ठा, याचबरोबर राज्यघटना आणि लोकशाही वाचवण्यासाठी स्वातंत्र्यसैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे सुपुत्र असलेले आणि काँग्रेस पक्षात बाजीप्रभू ठरलेले आमदार बाळासाहेब थोरात हे लढत असून त्यांच्या सर्व सभांना राज्यभरातील तरुणाईचा, महिला, शेतकरी व सर्व सामान्य नागरिक यांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. याचबरोबर भक्कम कार्यकर्त्यांची फळी आणि जनतेचा पाठिंबा यामुळे संगमनेर मतदार संघातील सर्व जनता एकवटली असून एक तालुका एक परिवार म्हणून आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी खंबीर असून आमदार थोरात हे राज्याचे प्रमुख नेते म्हणून महाविकास आघाडी पक्षाच्यावतीने स्टार प्रचारक म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळत आहेत.
सोशल मीडियावरही आमदार थोरात यांची क्रेझ
राजकारणात सध्या चिखल फेक सुरू असून अशा वातावरणातही विचारांची एकनिष्ठता ,स्वच्छ व सुसंस्कृतपणा, सर्वसामान्यांच्या विकासासाठी असणारी तळमळ यामुळे लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांची राज्यभरातील सर्व पक्षांमधील तरुणाई व नागरिकांमध्ये आमदार थोरात यांची मोठी क्रेझ आहे.