आपला जिल्हा

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पाट पाण्यासाठी फॉर्म नंबर ७ भरावा

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पाट पाण्यासाठी फॉर्म नंबर ७ भरावा
गोदावरी डाव्या व उजव्या कालव्याला लवकरच सुटणार उन्हाळी आवर्तन
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ६ मे २०२४ मागील वर्षाच्या अत्यंत कमी पर्जन्यमानामुळे कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांसह पूर्व भागाला मोठ्या प्रमाणात पाण्याची झळा जाणवत असून जर अशीच परिस्थिती राहिली तर काही दिवसात पिण्याच्या पाण्याचा देखील वनवा मोठ्या प्रमाणात भासु शकते त्यामुळे या सर्वातून मार्ग काढण्यासाठी शेतात उभे असलेल्या शेवटच्या घटका मोजत असलेल्या पिकांना नियमानुसार कॅनॉलचे हक्काचे पाणी मिळावे याकरिता जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे रीतसर फॉर्म नंबर ७ भरून आपल्या शेतातील पिकांसाठी पाणी आरक्षित करावे.

जाहिरात
कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवत असून यामुळे शेवटच्या घटका मोजत असलेली शेतातील बारामाही पिके व जनावरांसाठी असलेल्या चाराचे भवितव्य धोक्यात आले आहे तर नागरिकांसह जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे त्यामुळे स्थानिक नेत्यांच्या मागणीनुसार प्रशासनाने पुढील आठवड्यापासून गोदावरी कालव्यांना उन्हाळा हंगामा मधील सन २०२३-२४ चे आवर्तन सोडण्याचे नियोजन केले असून त्या अनुषंगाने प्रशासनाने शेतकऱ्यांना नजीकच्या सिंचन शाखा कार्यालयात दिनांक १२ मे पर्यंत सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत फॉर्म नंबर ७ भरण्याचे आवाहन केले आहे.

जाहिरात
त्यामुळे गोदावरी कालव्याच्या जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील उभी पिके जगण्यासाठी तात्काळ नजीकच्या सिंचन कार्यालयात जाऊन गोदावरी कालव्याचे हक्काचे पाणी मिळावे याकरिता दि १२ मे सायंकाळी सहा ६.१५ वाजेपर्यंत फॉर्म नंबर ७ म्हणजेच हक्काचा पाणी मागणी अर्ज रीतसर कागदपत्रे व फॉर्म फी भरून आपले पाणी आरक्षित करावे जर या कॅनॉल च्या पाण्यामुळे आपल्या शेतातील पिकांना पाणी मिळाले तर आपल्या शेतातील जलस्रोतांची पाणी पातळी वाढून पाऊस येईपर्यंत आपला व जनावरांचा पिण्याचा प्रश्न काहीसा दूर होऊ शकेल? अन्यथा उद्याची परिस्थिती अत्यंत बिकट होऊ शकते? त्यामुळे जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांनी फॉर्म नंबर ७ पाणी मागणी अर्ज भरावा.

कॅनॉल

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे