आकाश नागरे काँग्रेसरेनबो स्कूल

रेनबो इंटरनॅशनल स्कूलचा १०वी CBSE बोर्ड परीक्षा २०२४ मध्ये उत्कृष्ट निकाल

रेनबो इंटरनॅशनल स्कूलचा १०वी CBSE बोर्ड परीक्षा २०२४ मध्ये उत्कृष्ट निकाल

भक्ति अमर कवडेने रचला विक्रम ९७.२% टक्क्यांसह गणितात १०० पैकी १०० गुण

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १४ मे २०२४शिक्षणमहर्षी स्व. लहानुभाऊ नागरे स्थापित रेनबो इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी CBSE १० वी बोर्ड परीक्षा २०२३-२४ मध्ये अत्यंत उत्कृष्ट निकाल मिळवला आहे. एकूण ३२ विद्यार्थ्यांच्या बॅचमध्ये परिणामे १००% निकाल प्राप्त झाला आहे. प्रथम क्रमांक भक्ति अमर कवडे ९७.२% गुणांसह, गणित विषयात १०० पैकी १०० व इंग्रजी विषयात ९८ व  सामाजिक अभ्यासात १०० गुण प्राप्त केले आहे.

जाहिरात

त्यासोबतच अभिनय धीरज बाजाज (९४.४%), दिव्या पुष्पेंद्र शर्मा (९३.८%), हर्षदा सचिन शिंदे (९२%), साक्षी अनंत वाणी (९०.८%) आणि समिधा दिपक औताडे (९०.४%) यांच्यासह इतर विद्यार्थ्यांना मेरिट, डिस्टिंक्शन व फर्स्ट क्लास गुण प्राप्त झाले.

Oplus_131072

मागील वर्षी देखील ५३ पैकी २१ विद्यार्थी ९०% च्या पुढे राहून रेनबो स्कूलचा निकाल अहमदनगर जिल्ह्यात सर्वोत्कृष्ठ ठरला होता. आजचा हा अद्वितीय निकाल रेनबो इंटरनेशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या उत्कृष्ट परिश्रमाचा प्रतिफळ आहे. या निकालाबाबत संस्थेचे अध्यक्ष कांतिल अग्रवाल, सचिव संजय नागरे, विश्वस्त मनोज अग्रवाल, आनंद दगडे, चांगदेव कातकडे, अर्जुन काळे, कार्यकारी संचालक व प्राचार्य आकाश नागरे, शैक्षणिक संचालक नानासाहेब दवंगे, उपप्राचार्य निलेश औताडे आदी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करुन अभिनंदन केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे