संजीवनी शैक्षणिक संस्था

संजीवनी अकॅडमीचा शाम गामी १२ वी सीबीएसई परीक्षेत ९० टक्के गुण मिळवुन सर्व प्रथम

संजीवनी अकॅडमीचा शाम गामी १२ वी सीबीएसई परीक्षेत ९० टक्के गुण मिळवुन सर्व प्रथम

                                                                      १०० टक्के निकालाची परंपरा कायम
जाहिरात

कोपरगांव विजय कापसे दि १७ मे २०२४सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एक्झामिनॅशनने (सीबीएसई-केंद्रिय माध्यमिक शिक्षण  मंडळ) २०२४ मध्ये घेतलेल्या  १२ वीच्या परीक्षांचे निकाल जाहिर केले असुन यात संजीवनी अकॅडमीच्या सायन्स विभागाच्या शाम  रमेशभाई गामी या विद्यार्थ्यांने ९० टक्के गुण मिळवुन सर्वप्रथम क्रमांकाने उत्तिर्ण होण्याचा बहुमान पटकाविला. संजीवनी अकॅडमीचा इ.१२ वी सायन्सचा निकाल १०० टक्के लागला असुन सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये उत्तिर्ण झाले आहे, अशी  माहिती संजीवनी अकॅडमीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

जाहिरात– पीटर इंग्लंड , कोपरगाव स्टोअरच्या GRAND ANNIVERSARY साठी आपणास खास आमंत्रण आणि यानिमित्त तुम्हाला एक खास ऑफर देत आहोत. आत्ताच भेट द्या आणि मिळवा प्रत्येक 1000 च्या खरेदीवर 500 ची सूट, संपर्क– ०२४२३-२९९२६१.पत्ता – अण्णाभाऊ साठे चौकाजवळ, येवला रोड, कोपरगाव.

        प्रांजल मनोज गोलेचा याने ८८ टक्के गुण मिळवुन दुसरा क्रमांक मिळविला. अभिषेक अजय शहाने ८६ टक्के गुण मिळवुन तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. रेवा प्रदिप देशपांडे व आयुष  मनोज माकोनी यांनी प्रत्येकी ८४ टक्के गुण मिळवुन चौथा क्रमांक पटकाविला. संजीवनी अकॅडमीने शैक्षणिक  गुणवत्तेसह सर्वच क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केला असुन आपले विद्यार्थी जागतिक स्पर्धेत टिकले पाहीजे, या हेतुने त्यांच्या शैक्षणिक क्षणिक गुणवत्तेबरोबरच इतर कौशल्ये रूजविण्याचे कार्य अखंड चालु असते, असे पत्रकात शेवटी म्हटले आहे.

जाहिरात

                  संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, प्राचार्या  शैला झुंजारराव व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

Oplus_131072
जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे