आपला जिल्हा

गोधेगाव शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न

गोधेगाव शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न

गोधेगाव शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ३० मार्च २०२५ :- कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोधेगावचे वार्षिक स्नेहसंमेलन व शतकपूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी शाळेला शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची संस्कृती जपत विविध गीतांवरती नृत्याविष्कार सादर केला कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली महाराजांच्या वेशभूषेमध्ये विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर केले तसेच सावित्रीबाई ,रमाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शेतकरी गीत देशभक्तीपर गीत, लखाबाई सह इतर नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले या कार्यक्रमाचे उद्घाटन गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश आबा परजणे ,कोपरगाव तालुक्याचे गटविकास अधिकारी संदीप दळवी, केंद्रप्रमुख विलास भांड, यांच्या हस्ते करण्यात आले

जाहिरात आत्मा

आलेल्या सर्व मान्यवरांचे सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले मुख्याध्यापक संतोष जाधव त्यांचे सहकारी भदाणे मॅडम, मोरे मॅडम चव्हाण सर,तसेच शाळेचे सर्व विद्यार्थी पालक युवक वर्ग व ग्रामस्थ गोधेगाव सर्वांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमासाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती तसेच तसेच गोधेगाव ग्रामस्थ व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी देखील या कार्यक्रमाचा आनंद घेतला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती गोधेगाव यांनी विशेष परिश्रम घेतले.

जाहिरात

यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भागिनाथ रांधवणे,उपाध्यक्ष संदीप शिरसाट, अनिल भोकरे, बाळासाहेब बगळे, पुंडलिक शिंदे,भाऊसाहेब भुजाडे,बापूसाहेबवाकचौरे,विनोद साळुंखे आदी ग्रामस्थ उपस्थित होते

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे