आरोही महिला बचत गट आयोजित हळदी कुंकू समारंभ उत्साहात
आरोही महिला बचत गट आयोजित हळदी कुंकू समारंभ उत्साहात
आरोही महिला बचत गट आयोजित हळदी कुंकू समारंभ उत्साहात

कोपरगाव विजय कापसे दि १ फेब्रुवारी २०२५– हिंदू धर्मात मकर संक्रांती सणाच्या पर्वकाळात सुहासणीचा पवित्र अशा हळदी-कुंकू समारंभास अनन्य साधारण महत्व असते या काळात अनेक ठिकाणी महिला एकत्र येत हळदी कुंकू समारंभ आयोजित करत एकमेकींला वाण देवाण घेवाण करत साजरा करत असतात.

याच सणाचे औचित्य साधत कोपरगाव शहरातील लक्ष्मी नगर येथील आरोही महिला बचत गटाच्या सर्व महिलांनी एकत्र येत हळदी कुंकवाचा छानसा कार्यक्रम आयोजित केला होता. या प्रसंगी प्रसिद्ध हेल्थ कोच तसेच महिला बचत गटाच्या सर्वेसर्वा मार्गदर्शिका हर्षा पाटील ,ॲड रश्मी कडू, महिला गटाचे अध्यक्ष सुरेखाताई कानडे आरती औताडे,अर्चना औताडे, रुपाली पगारे, संगीता पोटे आदी महिला बचत गटाच्या पदाधिकारी तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या प्रसंगी उपस्थित महिलांना हर्षा पाटील व ॲड रश्मी कडू यांनी उपस्थित महिलांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत महिला बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊन समाजात आपली एक वेगळी ओळख निर्माण करून स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहे ही अभिमानास्पद बाब असल्याचे गौरवपूर्ण उद्गार काढत सर्वाना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी महिला गटाच्या अध्यक्ष सुरेखाताई कानडे आणि त्यांचा संपूर्ण महिला बचत गट यांनी अथक परीश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जोशना बनसोडे यांनी केले.




