संजीवनी फार्मसी महाविद्यालयाच्या १२ विद्यार्थ्यांची मॅकलिओड्स फार्मास्युटिकल्समध्ये नोकरीसाठी निवड

संजीवनी फार्मसी महाविद्यालयाच्या १२ विद्यार्थ्यांची मॅकलिओड्स फार्मास्युटिकल्समध्ये नोकरीसाठी निवड
ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाची कामगिरी

कोपरगाव विजय कापसे दि १४ मार्च २०२६:संजीवनी शिक्षण संस्थेच्या संजीवनी फार्मसी महाविद्यालयातील १२ विद्यार्थ्यांची नामांकित मॅकलिओड्स फार्मास्युटिकल्स कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली असून या यशामुळे महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या कार्याला मोठे यश मिळाले आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे संस्थेचा शैक्षणिक दर्जा व उद्योग क्षेत्राशी असलेला प्रभावी समन्वय अधोरेखित झाला आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये बी. फार्मसीच्या श्रध्दा भोजराज झाडे, भक्ती घनश्याम खंडूजा, श्रावणी किशोर सहारे, प्रविण लक्ष्मण चव्हाण, तुषार गणेश ठोंबरे, आकाश संतोष गायकवाड व एम फार्मसीचे अजय सुनिल बनकर, आदित्य सुनिल बेंबडे, भाग्यश्री सुनिल माळवे, प्रतिक कैलास पवार, अथर्व अनिल शिंदे , पुजा विजय घुगे यांचा समावेश आहे.

महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राच्या गरजांनुसार प्रशिक्षण देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून उत्तम संधी उपलब्ध होत आहेत. उद्योग क्षेत्र व शैक्षणिक संस्था यांच्यातील परस्पर समन्वयामुळे विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी सहज उपलब्ध होत असून त्याचा मोठा फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होत आहे.

संजीवनी फार्मसी महाविद्यालयाला ऑटोनॉमस (स्वायत्त) दर्जा प्राप्त असल्यामुळे उद्योग जगताला अपेक्षित असलेल्या आधुनिक व कौशल्याधारित अभ्यासक्रमाचा समावेश शिक्षणामध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक तांत्रिक कौशल्ये विकसित होऊन ते उद्योग क्षेत्रासाठी सक्षम बनत आहेत. संजीवनी शिक्षण संस्थेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण घेऊन चांगल्या नोकरीत स्थिरावण्याचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे या निवडीमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. संजीवनीचे विद्यार्थी शैक्षणिक, क्रीडा, संशोधन आणि इतर विविध क्षेत्रांप्रमाणेच प्लेसमेंटच्या बाबतीतही आघाडीवर असल्याचे सिध्द होत आहे.

या यशाबद्दल संजीवनीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. तसेच संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी डायरेक्टर डॉ. विपुल पटेल, हेड ऑफ अकॅडमिक गव्हर्नन्स डॉ. रावसाहेब शेंडगे व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे डीन डॉ. प्रमोद कडू उपस्थित होते.



