आपला जिल्हा

साईज्योती हॉस्पीटल, लायन्स व लिनेस क्लब यांच्या वतीने महिला दिनी मोफत मूळव्याध तपासणी उपचार शिबीर

साईज्योती हॉस्पीटल, लायन्स व लिनेस क्लब यांच्या वतीने महिला दिनी मोफत मूळव्याध तपासणी उपचार शिबीर
साईज्योती हॉस्पीटल, लायन्स व लिनेस क्लब यांच्या वतीने महिला दिनी मोफत मूळव्याध तपासणी उपचार शिबीर
जाहिरात आत्मा

कोपरगाव विजय कापसे दि ५ मार्च २०२५गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या लायन्स व लिनेस क्लब च्या वतीने विविध समाजपयोगी उपक्रम राबवत असतात त्याच अनुषंगाने क्लबच्या वतीने कोपरगाव शहरातील प्रसिद्ध डॉ तुषार गलांडे व डॉ काजल गलांडे यांचे साईज्योती हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत शनिवार दिनांक ८ मार्च रोजी महिला साठी साई ज्योती हॉस्पिटलमध्ये मुळव्याध, भगंदर, फिशर या आजाराची मोफत तपासणी व मोफत औषध उपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

जाहिरात
साई ज्योती हॉस्पिटलच्या डॉ काजल गलांडे यांनी शिबिरा विषयी अधिक माहिती देतांना सांगितले की, मुळाव्याध, भगंदर, क्षारसूत्र व फिशर या आजारांसाठी ऑपरेशन अथवा इंजेक्शन पेक्षा आयुर्वेदिक क्षारसुत्र व लेझर उपचार आता फायदेशीर ठरत असुन, यात जास्त वेदना होत नाही व काही विश्रांतीची गरज असते यासर्व सुविधा कोपरगाव येथील साई ज्योती हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असून लायन्स क्लब लिनेस व साई ज्योती हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या या शिबीरामध्ये फक्त महिला रुग्णांची तज्ञ महिला डॉक्टरांच्या मार्फत मोफत तपासणी करत मोफत औषध उपचार केले जाणार आहे तसेच गरजू रुग्णांवर सवलतीच्या दरात आयुर्वेदीक क्षारसूत्र व गरजेनुसार लेझर उपचार केले जाणार आहेत तरी जास्तीत जास्त गरजू महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ गलांडे यांनी केले आहे.

जाहिरात
शनिवार दि ८ मार्च महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या या  शिबीराचा कालावधी  सकाळी १० ते २ वाजेपर्यंत साईज्योती हॉस्पीटल, संभाजी महाराज चौक येथे होणार असून, नाव नोंदणी साठी ७२४९ ६६३०६९ या नंबरवर संपर्क साधावा नाव नोंदणी केलेल्या रुग्णांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे