आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येवल्यात राजमाता जिजाऊना अभिवदन
आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येवल्यात राजमाता जिजाऊना अभिवदन
राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी साजरी
येवला प्रतिनिधी दि १८ जुन २०२४– विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण संचलित आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येवला चे अध्यक्ष हनुमंत भोंगळे यांच्या मार्गदर्शनातून व प्रेरणेतून येवला गुरुकुलात राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
प्रारंभी गुरुकुलचे प्राचार्य तुषार कापसे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रतिमा पूजन करण्यात आले व कार्यक्रमाची सुरुवात झाली. मनीषा कुमकर यांनी विद्यार्थ्यांना राजमाता जिजाऊ यांच्या विषयी माहिती सांगितली.राजमाता जिजाऊ यांनी शिवरायांना राजनिति शिकवली असे त्यांनी सांगितले.
प्राचार्य तुषार कापसे यांनी देखील विद्यार्थ्यांना जिजाबाई यांच्या बद्दल माहिती दिली.जिजाबाई यांनी शिवरायांवर संस्कार केले. लहानपणापासूनच त्यांना शिस्तीचे धडे दिले गेले म्हणूनच लहानगा शिवबा पासूनचा प्रवास छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचला.समान न्याय देण्याची वृत्ती व अन्याय करणाऱ्याला कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले.त्यांच्या संस्कारांमुळेच स्वराज्य निर्माण झाले असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री खानापुरे यांनी केले.कार्यक्रमाचा समारोप दिपाली टोर्पे यांनी केला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.