सह्याद्री विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा
सह्याद्री विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा
शारीरिक आणि मानसिक क्षमता विकसित करून शरीर, मन आणि बुद्धी विकसित करण्याचे काम योगातून होते.डाॅ. सुधीर तांबे
संगमनेर विजय कापसे दि २१ जुन २०२४– आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयाचा सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलामध्ये साजरा मोठ्या उत्साहात करण्यात आला. याप्रसंगी सह्याद्री शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.सुधीर तांबे मार्गदर्शन करताना, आपल्या शारीरिक ,मानसिक क्षमता विकसित होऊन शरीर आणि बुद्धी विकसित करण्याचे काम योगा प्रात्यक्षिके करत असतात. भारताने जगाला आयुर्वेद आणि योगा ही अनमोल देणगी दिलेली आहे. शरीर लवचिक बनवण्याचे काम योगातून होते .आरोग्य उत्तम राहण्यासाठी योगाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
याप्रसंगी विद्यालयाचे ज्येष्ठ क्रीडाशिक्षक के डी देशमुख आणि प्रा.भारत शिंदे सर यांनी विद्यार्थ्यांना योगदिनाची माहिती विशद करून विविध प्रात्यक्षिके सादर केली.
आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त प्रात्यक्षित सादर करताना सह्याद्री विद्यालयाचे शिक्षक किशोर देशमुख भारत शिंदे विद्यार्थी कल्याणी राजेंद्र गागरे व गायत्री गोरक्षनाथ भालेराव यांनी योगा विषयी प्रात्यक्षिक सादर करत उपस्थितांची मने जिंकली
या योगदिनास कार्यक्रमास उपस्थित प्रमुख मान्यवर अतिथींचा विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन डॉ.सुधीर तांबे, सह सेक्रेटरी दत्तात्रय चासकर , रजिस्ट्रार बाबुराव गवांदे ,पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड , विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य के जी खेमनर , उपप्राचार्य सुरसे सर ,उपमुख्याध्यापक वाळे सर, पर्यवेक्षक पवार सर, डोके सर , क्रीडाशिक्षक मिलिंद औटी, के डी देशमुख , शकील शेख सर, प्रा. भारत शिंदे सर , तसेच ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक वृंद, आणि विद्यालयाचे शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर सेवक वृंद आणि विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विरेश नवले सर यांनी तर आभारप्रदर्शन विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य के जी खेमनर सर यांनी केले.