संगमनेर प्रतिनिधी दि २२ जुन २०२४– विधिमंडळ पक्षाचे नेते माजी शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्तेमुळे संपूर्ण देशात आदर्शवत ठरलेल्या अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील एमबीए विभागातील शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील १०२ विद्यार्थ्यांना निकालापूर्वी चांगल्या पॅकेजवर नोकरी मिळाली असल्याची माहिती संचालक डॉ. बी एम लोंढे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना लोंढे पुढे म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात , मा आमदार डॉ सुधीर तांबे व विश्वस्त सौ शरयूताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी सातत्याने दैदीप्यमान यश संपादन केले आहे .चांगल्या गुणवत्तेबरोबर कॅम्पस इंटरव्यू मधून विद्यार्थ्यांना थेट नोकऱ्यांच्या संधी निर्माण झाली आहे.
उत्कृष्ट निकाल, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधील प्लेसमेंट ,विविध सेमिनार, कॉन्फरन्सचे आयोजन, नवीन उद्योजक घडवण्याचे महाविद्यालयाने केलेले प्रयत्न यांसह अद्यावत प्रशस्त इमारत, निसर्गरम्य परिसर, सर्व सुविधा युक्त असलेले महाविद्यालय ठरल्याने युजीसी चे नेक मानांकन सुद्धा झाले आहे.
पुणे विद्यापीठांतर्गत व्यवस्थापन शास्त्रात पीएचडी संशोधन केंद्र या महाविद्यालयात असून 32 विद्यार्थी पीएचडीचे शिक्षण घेत आहे. या महाविद्यालयात आठ प्राध्यापक पीएचडी धारक आहे. महाविद्यालयाच्या चांगल्या कामगिरीबद्दल एशिया टुडे रिसर्च अँड मीडिया या ग्रुप द्वारे व्यवस्थापन शास्त्रातील राष्ट्रीय पातळीवरील २०२२ चा बेस्ट इमर्जिंग इन्स्टिट्यूट इन महाराष्ट्र हा पुरस्कार सुद्धा या महाविद्यालयाला मिळाला आहे.
२०२३- २४ या शैक्षणिक वर्षातून १०२ विद्यार्थ्यांना निकालापूर्वीच चांगल्या पॅकेजवर आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली असून या विद्यार्थ्यांच्या नोकरी कमी प्लेसमेंट विभाग प्रमुख डॉ. नितीन भांड व इतर शिक्षकांनी विशेष परिश्रम केले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विधिमंडळ पक्षाचे नेते माजी शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात,माजी आमदार डॉ.सुधीर तांबे,विश्वस्त सौ.शरयू ताई देशमुख,इंद्रजीत भाऊ थोरात, डॉ.जयश्रीताई थोरात,संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे,व्यवस्थापक प्रा. व्ही.बी.धुमाळ, शैक्षणिक संचालक डॉ.जे.बी.गुरव यांचा विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.