आंतरराष्ट्रीय फुटबॉल पट्टू शंखवाळकर यांचे कोपरगावच्या सोमेश्वर महादेव मंदिरात पुजा आणि दर्शन
आंतरराष्ट्रीय फुटबॉल पट्टू शंखवाळकर यांचे कोपरगावच्या सोमेश्वर महादेव मंदिरात पुजा आणि दर्शन
आंतरराष्ट्रीय फुटबॉल पटू,पद्मश्री, आणि अर्जुन पुरस्कार सन्मानित ब्रह्मानंद शंखवाळकर यांचे सोमेश्वर महादेव मंदिरात पुजा आणि दर्शन
कोपरगाव विजय कापसे दि २५ जुन २०२४– कोपरगांव येथील श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे सोमेश्वर महादेव देवस्थान येथे भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार, पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार सन्मानित ब्रह्मानंद शंखवाळकर ज्येष्ठ सोमवार या शुभदिनाचे औचित्य साधत सोमेश्वर महादेवाची पुजा आणि आरती केली. या प्रसंगी त्यांचे समवेत टोकिओ ऑलिंपिक निरिक्षक अशोक दुधारे, शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित दिलीप घोडके उपस्थित होते.
या प्रसंगी सोमेश्वर महादेव देवस्थानचे प्रमुख महेंद्र पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके,व्यवस्थापक जयंत विसपुते यांनी त्यांना मानाचे पारंपरिक टोपी, उपरणे, श्रीफळ आणि प्रसाद देवून सन्मान केला. पौरोहित्य प्रदिपशास्री पदे, नंदू शेंडे (गुरव) यांनी केले.
सोमेश्वर महादेव देवस्थान येथे महाराष्ट्रासह देशातील भाविक दर्शनासाठी येत असतात. आजपर्यंत श्रीमंत पवार सरकार,संत रामदासी बाबा, संत अरविंद महाराज,संत तुकाराम यांचे वंशज शिवाजी महाराज मोरे, वर्ल्ड हाॅकी कप सुवर्ण पदक विजेते अशोककुमार ध्यानचंद, भारतीय हॉकी खेळाडू भुपेंद्र सिंग,पानिपतावर विश्वास पाटील,प्रसिद्ध देवस्थानचे पदाधिकारी, इतिहास संशोधन मंडळाचे सदस्य,लेखक, न्यायाधीश, जिल्हाधिकारी, मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार यांचे अनेक नामवंतांनी सोमेश्वर महादेव देवस्थान येथे भेट देत पुजा करून दर्शन घेतले आहे.
याप्रसंगी अर्जुन पुरस्कार सन्मानित ब्रम्हानंद शंखवाळकर यांनी अभिप्राय नोंदीत, “आज सोमेश्वर महादेव मंदिराला भेट दिली.सोमेश्वर महादेव पुजेने अंतरमनातून आनंद झाला आहे. दर्शनाने समाधान वाटते.सोमेश्वर देवस्थानचे धार्मिक महत्त्व जतन करणारे यांचेवर ईश्वराची कृपादृष्टी राहो. ओम नम:शिवाय ” असा अभिप्राय नोंदवला आहे.