श्री भवानी देवी मंदिरात नवरात्रोत्सव निमित्त सामुदायिक, महिषासुरमर्दिनी स्तोत्रम्, जोगवा, देवीची गोंधळ गीतांसह विविध कार्यक्रम.
श्री भवानी देवी मंदिरात नवरात्रोत्सव निमित्त सामुदायिक, महिषासुरमर्दिनी स्तोत्रम्, जोगवा, देवीची गोंधळ गीतांसह विविध कार्यक्रम.
श्री भवानी देवी मंदिर ट्रस्ट, संस्कृत भारती, सूर्यतेज संस्था, श्रीमंत प्रगत शिवाजी रोड कोपरगाव,अंबिका तरुण मंडळ, वतीने आयोजन
कोपरगाव विजय कापसे दि १३ ऑक्टोबर २०२४– देवीचे विविध रुप आणि अवतार यातून मातृशक्तीने बोध घेण्यासारखे बरेच काही आहे. कुटुंब व्यवस्थेसह सर्वच क्षेत्रात मुली-महिला प्रगती करत आहेत. शिक्षण, सेवाकार्य, राष्ट्रीय संकट, संविधानाचा आदर, राष्ट्रहीतासाठी मतदान कार्यात कर्तव्य भावनेने मातृशक्ती सजग रहाण्याची गरज असल्याचे आवाहन राष्ट्रसेविका प्रा. लताताई भामरे यांनी केले.
कोपरगाव शहरातील जुने गावठाण भागातील कुंभारवाड्यालगत शेकडो वर्षांची परंपरा असलेले श्री भवानी देवी मंदिर आहे. या मंदिरात देवीच्या साडेतीन शक्तिपीठांची एकत्र स्थापना करण्यात आली आहे.यात रेणुकामाता (माहुरगड), तुळजाभवानी (तुळजापुर), महालक्ष्मी (कोल्हापूर) सप्तशृंगी (वणी) या देवींच्या स्थापना करण्यात आली आहे.
श्री भवानी देवी मंदिर ट्रस्ट,कोपरगाव, संस्कृत भारती, सूर्यतेज संस्था, श्रीमंत प्रगत नवरात्रोत्सव मंडळ,अंबिका तरुण मंडळ सह डॉ.सी.एम मेहता कन्या विद्यालयाच्या १२१ विद्यार्थ्यांनींचे सामुदायिक “महिषासुरमर्दिनी स्तोत्रम्”चे वाचन नवरात्रोत्सवाच्या अष्टमी निमित्त आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनींनी महिलांसोबत सहभागी होवून संस्कृत भाषेतील “महिषासुरमर्दिनी स्तोत्रम्” चे शब्द आणि स्वरांचा सुरेख संगम साधत सामुदायिक वाचन केले.शारदा संगीत विद्यालयाचे संचालक केतन कुलकर्णी आणि दिपाली कुलकर्णी यांनी देवीचा अभंग सादर करत महिषासुरमर्दिनी स्तोत्रम् सामुदायिक वाचनास संगित साथ दिली.
या प्रसंगी राष्ट्रसेविका प्रा. लताताई भामरे, संस्कृत भारतीच्या अनिता माळी,मयुर कुलकर्णी, माजी उपनगराध्यक्ष सुधाप्पा कुलकर्णी,डॉ.सी.एम.मेहता कन्या विद्यालयाच्या प्राचार्य प्रमोदिनी शेलार, श्री भवानी देवी मंदिराचे व्यवस्थापक सौ.ऊषा भालचंद्र गायकवाड,सौ.वैशाली गायकवाड,अध्यक्ष विनायक गायकवाड,बंडोपंत गायकवाड,सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके,वर्षा जाधव,श्रीमंत प्रगत चे संस्थापक संतोष साबळे,सौ.मनिषा साबळे, जनार्दन शिंदे,गणेश बिडवे, संस्कृत शिक्षिका सौ. शोभा दिघे, कविता निकम, मंगल निर्मळ, सुनिता वाबळे,गोपिनाथ गायकवाड, ओंकार गायकवाड, चैतन्य गोवेकर, समर्थ गायकवाड यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
संस्कृत ही प्राचीन भाषा असून अनेक ग्रंथ दूर्मिळ दस्त याच भाषेत आढळतात.संस्कृत भाषेचे ज्ञान शालेय विद्यार्थ्यांना अवगत रहावे. या भाषेची अभिवृद्धी व्हावी.म्हणून संस्कृत भाषेतील विविध स्तोत्रे,श्लोकांचे निरंतर वाचन सुरु असते.नियमित वाचनाने उच्चार सुधारणा होण्यास मदत होते.असे संस्कृत भारतीचे मयुर कुलकर्णी यांनी सांगितले.
या प्रसंगी देवस्थाचे वतीने गायकवाड परिवाराकडून कुसुम गायकवाड यांनी कुमारिका पुजन केले.उपस्थितांना श्रीफळ आणि स्नेहवस्र देवून सन्मान करण्यात आला. फराळ वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.
उपस्थितांचे स्वागत शुभम गायकवाड, प्रास्ताविक संतोष साबळे, सुत्रसंचालन संस्कृत भारतीच्या अनिता माळी यांनी तर आभार स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी मानले. शेकडो वर्षांपासून अंबिका देवी मंदिरात भवानी देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने नवरात्रोत्सव निमित्त विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबविले जातात. “महिषासुरमर्दिनी स्तोत्रम्” वाचनाने आणि धार्मिक कार्यक्रमाने परिसराचे वातावरण भक्तिमय झाले होते.भाविकांनी विद्यार्थ्यांनींचे कौतुक केले आहे.