शुक्राचार्य ट्रस्ट

माजी आमदार भुजबळ यांची शुक्राचार्य मंदिरास भेट

माजी आमदार भुजबळ यांची शुक्राचार्य मंदिरास भेट

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदार संघाचे माजी प्रतिनिधी
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ३ जुलै २०२४- कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या पवित्र अशा गोदावरी किनारी वसलेल्या जिथे कोणतेही शुभकार्य करण्यास मुहूर्त लागत नाही असे समजले जाणाऱ्या जगातील एकमेव गुरु शुक्राचार्य महाराज मंदिरास नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदार संघाचे माजी लोकप्रतिनिधी माजी आमदार पंकज छगनराव भुजबळ यांनी मंदिराला भेट देत परम सद्गुरू शुक्राचार्य महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले.

जाहिरात

या प्रसंगी माजी आमदार पंकज भुजबळ यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितले की, मंदिरात आल्यानंतर मंदिर अती भव्य असल्याचे जाणवते तसेच मंदिरात लाभणारी शांतता व प्रसन्नता या गोष्टीचे प्रकर्षाने व प्रामुख्याने त्यांनी अनुभूती घेतली आसल्याचे सांगितले तसेच या प्रसंगी मंदिर व्यवस्थापन समिती सदस्यांकडून मंदिराचा इतिहास जाणून घेत मंदिर अतिसुंदर विशाल असल्याचं सांगत  अतिशय पुरातन अशा मंदिराची अतिशय छान काळजी घेत आसल्याबद्दल संपूर्ण मंदिर समितीचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

याप्रसंगी मंदिर प्रशासनाच्या वतीने मंदिर प्रमुख सचिन परदेशी यांच्या हस्ते माजी आमदार पंकज भुजबळ यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मंदिर उपप्रमुख प्रसाद पऱ्हे,ओमकार आव्हाड, मंदिर व्यवस्थापक राजाराम पावरा, मंदिर पुजारी जोशी गुरु व भंनगे गुरु आदी उपस्थित होते.

सन्मान करतांना

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे