आपला जिल्हा

तीळवणी  समाज मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याची स्थापना

तीळवणी  समाज मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याची स्थापना
तीळवणी  समाज मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याची स्थापना
जाहिरात आत्मा

कोपरगाव विजय कापसे दि १ फेब्रुवारी २०२५कोपरगाव तालुक्यातील तीळवणी गावातील बौध्द वस्तीत असलेल्या समाज मंदिरात  २८ जानेवारी रोजी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याची स्थापना करण्यात आली.

जाहिरात
सदर अर्धाकृती पुतळा सुनंदा नकुल गायकवाड यांनी त्यांचे पती दिवंगत नकुल गायकवाड यांच्या स्मरणार्थ आपल्या माहेरातील समाज मंदिरास दान दिला. सदर प्रसंगी वास्तविका व ऋतिका या उपस्थित होत्या.तर भारतीय बौद्ध महासभेचे कोपरगाव तालुका अध्यक्ष  विश्वास जमधडे यांनी या ठिकाणी बौध्द धम्म विधी करून सदर पुतळ्याची स्थापना केली.

जाहिरात
या प्रसंगी समाज सेविका  शांताबाई दगडू पगारे, कारभारी पगारे, सरपंच  गोविंदभाऊ पगारे, माजी सरपंच राजश्री बागुल, संदीप पगारे, फकिरा  पगारे, सीताराम पगारे, मच्छिंद्र पगारे, अशोक पगारे, बाबासाहेब पगारे, दीपक पगारे,  विजय पगारे,बंटी पगारे,बापू पगारे, पायल पगारे, संगीता पगारे, सुमनबाई मैंद, मंगला पगारे, सविता मैंद, कल्पना पगारे, साक्षी पगारे, अर्णव बागुल, करण  पगारे, सोहम मैंद सुलक्षण बागुल, पत्रकार ॲड. साईप्रसाद डोखे उपस्थित होते.

जाहिरात
सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार विशेष कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर दगडू पगारे यांनी केले. 

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे