आपला जिल्हा

पत्रकार संघाच्या वतीने किरण बिडवे व सोमैय्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी चंचल जाधव यांचा सत्कार 

पत्रकार संघाच्या वतीने किरण बिडवे व सोमैय्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी चंचल जाधव यांचा सत्कार 
पत्रकार संघाच्या वतीने किरण बिडवे व सोमैय्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी चंचल जाधव यांचा सत्कार 
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ४ जुलै २०२४कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने नुकतेच महाराष्ट्र परिवहन मंडळ कामगार सेनेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्षपदी किरण बिडवे यांची नियुक्ती झाल्याबद्दल तसेच पत्रकार संघाचे जेष्ठ सदस्य संतोष जाधव यांची कन्या चंचल जाधव यांनी बी. कॉम परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल मान्यवर पत्रकारांच्या हस्ते सन्मान करत भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

जाहिरात

किरण बिडवे हे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र परिवहन मंडळ कामगार सेनेच्या महाराष्ट्र राज्य संघटनेत काम करत आहे या माध्यमातून त्यांनी अनेक कामगार तसेच कर्मचारी अधिकारी यांच्या समस्या त्यांनी सोडविल्या आहे शिवसेनेमध्ये अनेक वर्षांपासून ते कामकाज करत असून सामाजिक कामात देखील ते नेहमी अग्रेसर असतात याच त्यांच्या कार्याची दखल घेत पुन्हा त्याची महाराष्ट्र परिवहन मंडळ कामगार सेनेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे.

जाहिरात

तसेच कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे जेष्ठ सदस्य संतोष जाधव यांची कन्या ह भ प भीमराज महाराज जाधव यांची नात चंचल संतोष जाधव ही टी वाय बी कॉम या परीक्षेत ए ग्रेडने उत्तीर्ण झाली असुन ती के.जे. सोमय्या महाविद्यालयाची  विद्यार्थिनी आहे. तिने महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ बी.एस यादव ,  जाधव सर,  आरगडे सर,  यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करून  उत्कृष्ट असे यश प्राप्त करत ए ग्रेड मिळवत उत्तीर्ण झाली आहे. या निमित्ताने कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने किरण बिडवे आणि चंचल जाधव यांचा सत्कार करत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जाहिरात
या प्रसंगी कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष युसूफभाई रंगरेज, उपाध्यक्ष शैलेश शिंदे यासह सोमनाथ सोनपसारे , सिद्धार्थ मेहेरखांब, सतिष गुजराथी, मोबिन खान ,रवींद्र जगताप, शाम गवंडी, अनिल दिक्षित, राहुल देवरे, बिपिन गायकवाड सचिन धर्मापुरिकर,स्वप्निल कोपरे,सुनिल ससाणे,विजय कापसे, संतोष जाधव आदि पत्रकारांनी उपस्थित रहात बिडवे व चंचल जाधव यास शुभेच्छा दिल्या.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे