आपला जिल्हा

ईद-ए-मिलादनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट मुस्लिम विकास कमिटी व डी सरकार ग्रुपचा स्तुत्य उपक्रम; गरजू नागरिकांना ब्लँकेटचे वाटप

ईद-ए-मिलादनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट मुस्लिम विकास कमिटी व डी सरकार ग्रुपचा स्तुत्य उपक्रम; गरजू नागरिकांना ब्लँकेटचे वाटप

ईद-ए-मिलादनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट मुस्लिम विकास कमिटी व डी सरकार ग्रुपचा स्तुत्य उपक्रम; गरजू नागरिकांना ब्लँकेटचे वाटप

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १ सप्टेंबर २०२६ :ईद-ए-मिलादुन्नबी (पैगंबर जयंती) निमित्त आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका मुस्लिम विकास कमिटी व डी सरकार ग्रुप यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविण्यात आले.

जाहिरात

कोपरगाव शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोर्डिंग, श्री चक्रधर स्वामी शाळा, गीता प्रशाला, उर्दू शाळा (कोर्ट रोड), नगरपरिषद शाळा क्र. ६, उर्दू अँग्लो हायस्कूल, तसेच मदरसा शाळा आदी शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिलसह आवश्यक शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच गरीब व गरजू नागरिकांना ब्लँकेटचे वितरण करण्यात आले. शिक्षणाला प्रोत्साहन देतानाच गरजूंच्या मदतीला धावून जाण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. ईद-ए-मिलादच्या माध्यमातून शांतता, बंधुभाव, सामाजिक एकता आणि मानवसेवेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

जाहिरात

यावेळी आमदार आशुतोष काळे यांच्या वतीने कोपरगाव शहर व तालुक्यातील सर्व नागरिकांना ईद-ए-मिलादुन्नबीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. समाजातील सर्व घटकांनी परस्पर प्रेम, सलोखा व बंधुभाव कायम ठेवून एकोप्याने वाटचाल करावी अशी भावना व्यक्त करण्यात आली. या उपक्रमासाठी मुस्लिम विकास कमिटीचे संस्थापक नगरसेवक हाजीमहेमुद सय्यद, तालुका अध्यक्ष आयुब शेख, शहराध्यक्ष साजिद शेख, अमजद पठाण, डी सरकार ग्रुपचे अध्यक्ष नाजिम शेख, युसुफ शेख, आदिल सय्यद, सोनू शेख, अनिस पठाण, सिद्धार्थ शेळके, नितीश बोरुडे, अक्षय आंग्रे, जुनेद तांबोळी, वसीम शेख,अतिक शेख व शफीक शेख यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमाचे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी स्वागत केले.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे