माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

जिल्हा विभाजन करणार असेल तर कोपरगाव जिल्हा करावा – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

जिल्हा विभाजन करणार असेल तर कोपरगाव जिल्हा करावा – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

जिल्हा कार्यालयास आवश्यक त्या सर्व सोयीनियुक्त कोपरगाव तालुका

कोपरगाव विजय कापसे दि १४ जुलै २०२४सध्या १५ ऑगस्ट पूर्वी शासनाने नवीन जिल्हा जाहीर करावा असे काही तालुक्यातून गावे बंद ठेवून मागणी होत आहे. मेरिट व नागरिकांच्या सोयीचा तालुका असल्याचा विचार केल्यास कोपरगाव हेच नवीन जिल्ह्याचे ठिकाण होण्यासाठी योग्य. आत्ताचे नूतन अहिल्यानगर व पूर्वीचे अहमदनगर हे सर्वात मोठ्या क्षेत्रफळाचे जिल्ह्याचे ठिकाण आहे. गेल्या ४० वर्षापासून या जिल्ह्याचे विभाजन होण्यासाठी प्रत्येक तालुका प्रयत्न करत आहेत त्यामुळे शासन जर अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करणार असेल तर कोपरगाव हेच उत्तर नगर जिल्ह्याचे प्रमुख केंद्र म्हणजे जिल्हा करावा अशी मागणी कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे मागणी केली आहे.

जाहिरात

या पत्रकात पाटील यांनी म्हटले आहे की, सध्याचा नागरिकांचे हिताचा व वेळेचा विचार करता कोपरगाव हेच जिल्हा होण्यासाठी सर्व तालुक्यांच्या सुईचे व हिताचे आहे. कोपरगाव शहरांमध्ये रेल्वे स्थानक आहे , नूतन नवीन बस स्टॅन्ड झालेले आहे. पोस्ट ऑफिस ची मोठी अद्यावत बिल्डिंग आहे व जागाही आहे. कोपरगाव शहरालगत हायवेला खेटून शासनाच्या जमिनी आहेत या ठिकाणी नूतन ऑफिसेस होऊ शकतात. कोपरगाव शहरात पोलीस स्टेशनचे नूतन वास्तूचे काम झालेले आहे. कोर्टाच्या ही नवीन बिल्डिंग झालेल्या आहेत, होत आहेत. तहसील कार्यालयामध्येही नूतन ऑफिस सुरू होऊ शकतात अशी मोठी वास्तू आहे. त्यालगत पंचायत समिती ची नवीन मोठी वास्तू ही आहे.
सर्वात महत्त्वाची समृद्धी महामार्गाची लँडिंग हे कोपरगाव तालुक्यात जेऊर कुंभारी भागात आहे. विमानतळ कोपरगाव तालुक्यात काकडी येथे आहे व लवकरच मालवाहतूक कार्गो सेवा ही सुरू होणार आहे. विमानतळामुळे व मुंबई नागपूर समृद्धी महामार्गामुळे व जुना नगर मनमाड हायवे असल्यामुळे इतर तालुक्यांसाठी दळणवळणासाठी ही व्यापार वाढीसाठी कोपरगाव हे ठिकाण अत्यंत योग्य आहे. कोपरगाव तालुक्यात समृद्धी महामार्ग लगत स्मार्ट सिटी होणार आहे. कोपरगाव तालुक्याच्या लगत नूतन एमआयडीसी व कृषी विद्यापीठ होणार आहे. तालुक्यात औद्योगिक वसाहती आहे.

जाहिरात

पौराणिक महत्त्व असलेले जगातील एकमेव शुक्राचार्य महाराजांचे त्याच बरोबर थोर ऋषीमुनींचे साधुसंतांचे समाधी स्थान मंदिरे हे कोपरगाव तालुक्यात आहे. गोदावरी नदी कोपरगाव शहराच्या लगत तालुक्यातून वाहत आहे. कोपरगाव तालुक्यातील उजवे डावे असे दोन्ही कालवे वाहतात व इमर्जन्सी मध्ये एक्सप्रेस कॅनल ही कोपरगाव तालुक्यातून जातो. कोपरगाव शहरापासून चारी बाजूला नासिक, अहिल्यानगर ( अहमदनगर) ,औरंगाबाद , मालेगाव यांच्या अगदी मध्य भागात कोपरगाव येते. कोपरगाव शहराजवळच काही अंतरावरच मनमाड जवळ असल्याने व्यापाऱ्यांना दळणवळणासाठी अगदी सोयीचे आहे. सर्वात महत्त्वाची कोपरगाव तालुक्यात शिक्षणासाठी व उच्च शिक्षणासाठी अद्यावत असे शाळा , कॉलेजेस मुला मुलींच्या शिक्षणासाठी आहेत. यात आर्ट्स , कॉमर्स , सायन्स कॉलेज , तसेच एमबीए , बी फॉर्म , एम फॉर्म , इंजीनियरिंग , आयुर्वेदिक होमिओपॅथिक , नरसिंग असे उच्च शिक्षणासाठी लागणारी शैक्षणिक संस्था आहेत. नवीन हॉस्पिटलही मोठ्या प्रमाणात कोपरगावा लगत झाले आहे व होत आहेत. राहण्यासाठी दिवसासाठी शांत चांगले असे हे गाव आहे.

जाहिरात

इतर तालुक्यांपेक्षा जिल्हा होण्यासाठी कोपरगाव हे अगदी योग्य सोयीचे , मेरिट चे ठिकाण आहे. त्यामुळे कोपरगावातील जनतेला इतर तालुक्यांप्रमाणे गाव बंद ठेवून , तालुका बंद ठेवून मागणी करण्याची गरज नाही. त्यामुळे या शासनाने १५ ऑगस्ट पूर्वी जिल्ह्याचे विभाजन व्हावं असे इतर तालुक्यातून जरी मागणी होत असली तरी भौगोलिक दृष्ट्या कोपरगाव हेच जिल्ह्याचे ठिकाण होण्यास योग्य असल्याने , शासनाने कोपरगाव जिल्हा घोषित करावा व कोपरगाव जनतेला न्याय द्यावा. जेणेकरून जिल्हा झाल्यानंतर कोपरगाव चे भाग्य उजळेल व व्यापार धंदा वाढीसाठी युवकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी व इतर तालुक्यांतील नागरिकांना कोपरगाव या नूतन जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्या येण्यासाठी हे सर्वात सोयीचे होणार असल्याने कोपरगाव हेच जिल्ह्याचे ठिकाण म्हणून घोषित करावे अशी मागणी पाटील यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

जाहिरात
मंगेश पाटील

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे