आदिनाथ ढाकणे
जिल्हाधिकारी सालीमठ यांनी घेतला चला जाणूया नदी उपक्रमाचा आढावा
जिल्हाधिकारी सालीमठ यांनी घेतला चला जाणूया नदी उपक्रमाचा आढावा
अहमदनगर जिल्ह्यातील सर्व नदी प्रहरीची उपस्थिती
कोपरगाव विजय कापसे दि १६ जुलै २०२४– महाराष्ट्र शासनाच्या चला जाणूया नदीला या उपक्रमांतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील शासन नियुक्त सर्व नदी प्रहरी ची व प्रशासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक नुकतीच अहमदनगरचे जिल्हाधिकारी आणि अहमदनगर जिल्हा उपवन संरक्षक अधिकारी यांच्या उपस्थितीत अहमदनगर येथे संपन्न झाली.
या बैठकी प्रसंगी अहमदनगर जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, अहमदनगर जिल्हा उप वनसंरक्षक अधिकारी सुवर्णा माने यांच्या सह अहमदनगर जिल्ह्यातील सर्व विभागाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत अहमदनगर जिल्ह्यातील सर्व नद्यांचे पुनर्जीवन संदर्भातील कामा संदर्भांत चर्चा होऊन केलेल्या कामाचा अहवाल व त्या संदर्भात नदी संवाद यात्रेस आवश्यक ते बजेट सादर करण्याचे संबंधितांना सांगण्यात आले.
यावेळी जलबिराद्ररीचे नरेंद्र चुग, नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील अगस्ती नदीचे नदीप्रहरी आदिनाथ ढाकणे, मोती नदीचे नदीप्रहरी मनोज साठे, आढळा व माळुंगी नदीचे नदीप्रहरी विठ्ठल शेवाळे, सुभाष, देशमुख, संपत देशमुख आदी उपस्थित होते.