प्रा.मा.रा.लामखडे यांचा शनिवारी अमृत महोत्सव गौरव व पुस्तकाचे प्रकाशन
आ.थोरात, ॲड.असीम सरोदे, डॉ. जयदेव डोळे, डॉ रावसाहेब कसबे, प्रा. रंगनाथ पठारे यांची उपस्थिती
या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती देताना माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की प्रा. मा.रा.लामखडे हे अत्यंत विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून ओळखले जात आहेत. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी शैक्षणिक क्षेत्र व विद्यार्थ्यांशी जवळीक कायम ठेवली आहे. राष्ट्रसेवा दल आणि बाबा आमटे यांच्या आनंदवन मधून प्रेरणा घेत त्यांनी श्रमसंस्कार शिबिर सुरू केले यातून अनेक विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्त्व कळले असून ही परंपरा आजही कायम आहे. मराठी साहित्य विश्वात त्यांचे योगदान असून त्यांनी 22 पुस्तकांची निर्मिती केली आहे.
त्यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त चाकोरीपलीकडचा या पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे. मालपाणी लॉन्स येथे शनिवार दिनांक 27 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम होणार असून याप्रसंगी काँग्रेसनेते आमदार बाळासाहेब थोरात, साथी पन्नालाल सुराणा,निर्भय बनो आंदोलनाचे प्रवर्तक ॲड असीम सरोदे, पुरोगामी विचारवंत जयदेव डोळे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ रावसाहेब कसबे, प्रा रंगनाथ पठारे, आमदार लहू कानडे, डॉ. संजय मालपणी, सौ दुर्गाताई तांबे, डॉ जयश्रीताई थोरात आदींसह संगमनेर मधील सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी या पुस्तक प्रकाशन व अमृत गौरव सोहळ्यानिमित्त संगमनेर मधील तमाम साहित्य प्रेमी माजी विद्यार्थी नागरिक व बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रा. मा.रा.लामखडे गौरव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.