आपला जिल्हा

शुक्राचार्य मंदिरास अहमदाबाद येथील भक्ताकडून दीड किलोचा चांदीचा नाग अर्पण

शुक्राचार्य मंदिरास अहमदाबाद येथील भक्ताकडून दीड किलोचा चांदीचा नाग अर्पण
    शुक्राचार्य मंदिरास अहमदाबाद येथील भक्ताकडून दीड किलोचा चांदीचा नाग अर्पण
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २५ एप्रिल २०२५जिथे कोणतेही शुभ कार्य करण्यास कोणताही मूहूर्त पाहवा लागत नाही असे कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या पवित्र गोदावरी नदी किनारी वसलेले जगातील एकमेव परम सद्गुरू शुक्राचार्य मंदिरास वर्षभरात अनेक देश-विदेशातील भाविक भक्त मोठ्या भक्ती भावाने भेट देत स्वईच्छने वेग-वेगवेगळ्या पद्धतीचे दान शुक्राचार्य मंदिरात करत असतात असेच नुकतेच गुजरात या राज्यातील अहमदाबाद येथील शुक्रभक्त यांनी परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज मंदिरास तब्बल दीड किलो चांदीचा नाग अर्पण केला आहे.

जाहिरात

  सविस्तर वृत्त असे की, शुक्रवार दि २५ एप्रिल रोजी अहमदाबाद येथील शुक्र भक्त श्री देवांग व्यास व कुटुंबीय यांनी कोपरगाव येथील जगप्रसिद्ध गुरू शुक्राचार्य महाराज मंदिरास भेट देत तब्बल १ किलो ४५८ ग्रॅम वजनाचा चांदीचा नाग अर्पण केला. या बद्दल या दानशूर व्यक्तींचा  मंदिर प्रशासनाच्या वतीने आभार मानत यथोचित सन्मान करण्यात आला  या प्रसंगी परम सद्गुरू शुक्राचार्य मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड , गुरू नरेंद्र जोशी , गुरू राकेश भणगे, मंदिराचे व्यवस्थापक राजाराम पावरा , अँड उगले , श्री काकड साहेब, बाळासाहेब लकारे आदी उपस्थित होते.

जाहिरात
या प्रसंगी अहमदाबाद येथील शुक्र भक्त व्यास कुटूंबियांनी परम सद्गुरू शुक्राचार्य महाराजांचे मनोभावे दर्शन घेत संपूर्ण मंदिर परिसराची पाहणी करत समाधान व्यक्त करत मंदिर व महाराजांचा इतिहास जाणून घेतला.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे