युवासेना – शिवसेना तर्फे विनामुल्य सीईटी महासराव परीक्षा- शहरप्रमुख गगन भैय्या हाडा
युवासेना – शिवसेना तर्फे विनामुल्य सीईटी महासराव परीक्षा- शहरप्रमुख गगन भैय्या हाडा

कोपरगाव विजय कापसे दि २६ मार्च २०२५–अकरावी, बारावी व पदवीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सलग ६ व्या वर्षी महाराष्ट्र राज्यातील सर्व २८८ विधानसभेत शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात व शिवसेना तथा युवासेना सचिव आमदार वरूण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अकरावी, बारावी व पदवीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत सीईटी सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून कोपरगावात देखील या परीक्षेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती युवासेना शहरप्रमुख गगन भैय्या हाडा यांना प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.


यामध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी, फार्मसी विभागाच्या कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सदर सराव परीकक्षा कोपरगाव शहरातील मौनगिरी कोचिंग क्लासेस, श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याशेजारी, शगुन कलेक्शन समोर व शिंदे लासणकर क्लासेस, एच डी एफ सी बँक शेजारी खंदकनाला या केंद्रांवर ऑफलाईन स्वरूपात घेण्यात येणार आहे. तरी या सराव परीक्षेस सहभागी होण्यासाठी www.yuvasenacet.com या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी केलेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन युवासेना शहरप्रमुख गगन भैय्या हाडा यांनी केले आहे.





