चंद्रशेखर म्हस्के व कुटुंबियांच्या वतीने आमदार काळे यांचा वाढदिवसानिमित्त विद्यार्थिनींना शालेय वह्यांचे वाटप
चांगला अभ्यास करत कुटूंबाचे नाव लौकिक करावे- पुष्पाताई काळे
कोपरगाव विजय कापसे दि ६ ऑगस्ट २०२४– मुलींनी निरोगी व सुदृढ राहण्यासाठी चांगला सकस आहार घेत चांगला अभ्यास करून शाळेचे आणि आपल्या पालकांचे नाव लौकीक करावे असे प्रतिपादन इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांनी कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया सेलचे अहमदनगर जिल्हाअध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के, लतिका म्हस्के व म्हस्के कुटूंबीय यांच्या वतीने शालेयपयोगी वस्तूंचे वाटप प्रसंगी बोलतांना व्यक्त केले
कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार आशुतोष काळे यांचा रविवार दि ६ ऑगस्ट रोजी असलेला वाढदिवस त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी विविध उपक्रम राबवत मोठ्या जल्लोषात वाढदिवस साजरा केला यांच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया सेलचे अहमदनगर जिल्हाअध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के हे गेल्या ६ वर्षांपासून आमदार काळे यांच्या वाढदिवसानिमित्त अनाठायी खर्च टाळत शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करत वाढदिवस साजरा करत असता या वर्षी देखील कोपरगाव शहरातील नगरपालिका शाळा क्रमांक ३ या शाळेतील सर्वच विद्यार्थिनींना प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांच्या शुभहस्ते विद्यार्थिनींना ७२० वह्यांचे तसेच स्कॉलरशिप परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या पुस्तकांचा संच वाटप करत आमदार काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.