स्पर्धात्मक परिक्षेसह सर्वच ठिकाणी संजीवनीचे विद्यार्थी चमकावे हे स्व. शंकरराव कोल्हेंचे स्वप्न-अमित कोल्हे
कोकमठाणच्या वैभव भाउसाहेब जपे याने चार्टर्ड अकौंटंट होवुन ते पुर्ण केले त्याचा आम्हां सर्वांना अभिमान
कोपरगांव विजय कापसे दि ७ ऑगस्ट २०२४– ग्रामिण भागातील मुला मुलींमध्ये बौध्दीक संपदा ओतप्रोत भरलेली आहे त्याला योग्य दिशा देण्यांचे काम आपले आहे भारतीय प्रशासकीय सेवा, स्पर्धात्मक परिक्षेसह सर्वच क्षेत्रात संजीवनीचे विद्यार्थी चमकावे हे माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे स्वप्न होते आणि कोकमठाणच्या वैभव भाउसाहेब जपे याने चार्टर्ड अकौंटंट होवुन ते पुर्ण केले त्याचा आम्हां सर्वांना अभिमान आहे असे प्रतिपादन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टीटयुटचे कार्यकारी विश्वस्थ अमितदादा कोल्हे यांनी केले.
तालुक्यातील कोकमठाणचे रहिवासी व संजीवनी जुनिअर कॉलेजचे माजी विद्यार्थी चि. वैभव भाउसाहेब जपे याने चार्टर्ड अकौंटंट या परिक्षेत विशेष गुणानुक्रमे यश संपादन केल्याबद्दल त्याचा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना व संजीवनी एज्युकेशन सोसायटीच्यावतीने बुधवारी कारखाना कार्यस्थळावर सत्कार करण्यांत आला त्याप्रसंगी ते बोलत होते.
श्री. अमितदादा कोल्हे पुढे म्हणाले की, ग्रामिण भागातील मुला मुलींना के.जी पासुन पी. जी पर्यंत एकाच छताखाली दर्जेदार शिक्षण मिळावे, शेतक-यांची मुले प्रशासकीय पदावर झळकावी या उददेशाने माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी ४२ वर्षापुर्वी संजीवनी ग्रामिण शिक्षण संस्थेचे रोपटे लावले होते त्याचा आज वटवृक्ष झाला असुन त्यातुन अनेक नवरत्न बाहेर पडुन आपल्या बुध्दीमत्तेच्या जोरावर नांवलौकीक मिळवित आहे त्याचाच वैभव हा एक भाग आहे.
सत्कारास उत्तर देतांना वैभव जपे म्हणाले की, आई वडील, गुरूजन शिक्षक यांच्याकडुन मला संजीवनीत ज्ञानाचे बाळकडू मिळाले. संजीवनी ज्युनियर कॉलेज मधुन ८६ टक्के गुण मिळवुन बारावी उत्तीर्ण झालो त्यानंतर चार्टर्ड अकौंटंट होण्यासाठीची अवघड पात्रता परिक्षा उत्तीर्ण होवुन पुणे येथे सीएचे शिक्षण घेत दिवसातील १४ ते १६ तास अभ्यास करत त्यात यश मिळविले. माजीमंत्री शंकरराव कोल्हे आज हयात नसले तरी किर्ती रूपांने ते आपल्या पाठीशी आहे असे ते म्हणाले.
चिरंजीव वैभव याच्या यशाबददल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, विश्वस्थ सुमित कोल्हे आदिनी अभिनंदन केले. याप्रसंगी कारखान्याचे संचालक विश्वासराव महाले, प्राचार्य डॉ. राजन शेंडगे, बाजार समितीचे माजी सभापती संभाजी रक्ताटे, माजी सरपंच पोपटराव पवार, अण्णासाहेब लोहकणे, जालींदर निखाडे, वाल्मीकराव लोंढे, रामभाउ रक्ताटे, सुयोग सुभाष जपे आदि उपस्थित होते. शेवटी उपाध्यक्ष मनेष गाडे यांनी आभार मानले.