जयहिंद महिला मंच संगमनेर व सह्याद्री विद्यालयाच्या विद्यार्थिनींचा एक राखी सैनिकांसाठी अनोखा उपक्रम
जयहिंद महिला मंच संगमनेर व सह्याद्री विद्यालयाच्या विद्यार्थिनींचा एक राखी सैनिकांसाठी अनोखा उपक्रम
जयहिंद महिला मंच संगमनेर व सह्याद्री विद्यालयाच्या विद्यार्थिनींचा एक राखी सैनिकांसाठी अनोखा उपक्रम
एक राखी सैनिकांसाठी विद्यार्थ्यांना स्फूर्तीदायी व आत्मबल निर्माण करणारा उपक्रम दुर्गाताई तांबे
संगमनेर प्रतिनिधी दि ७ ऑगस्ट २०२४– भारतीयांना बहिणीचे आयुष्यभर संकटाचे निराकरण करण्यासाठी रक्षाबंधनातून नाते अधिक दृढ होते. भारत सर्वधर्मसमभावाची जोपासना करत असून सह्याद्री विद्यालयाचा एक राखी सैनिकांसाठी हा उपक्रम निश्चित विद्यार्थ्यांना स्फूर्तीदायी व आत्मबल निर्माण करणारा आहे. असे मत दुर्गाताई तांबे यांनी व्यक्त केले.

जयहिंद महिला मंच संगमनेर आणि भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालय व ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने एक राखी सैनिकांसाठी या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य के जी खेमनर यांनी सह्याद्री विद्यालयाच्यावतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सहशालेय उपक्रम तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थिनींनी प्रत्येक पाकिटात पाच याप्रमाणे अकरा हजार राख्या सीमेवरील जवानांसाठी संकलित करून एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित सैनिकांचा आणि मान्यवरांचा परिचय शिक्षक प्रतिनिधी श्री किशोर शिंदे सर यांनी करून दिला .

यावेळी विद्यार्थ्यांना सीमेवरील अनेक प्रसंगाचे आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून मेजर कमांडो लक्ष्मण ढोले , समाजसेविका वीरपत्नी शिलाताई करंजेकर, स्वराज्य सैनिक संस्थेचे संस्थापक श्री पोखरकर साहेब यांनी अनुभव विशद केले. विद्यालयाच्यावतीने उपस्थित जवानांचा व प्रमुख पाहुण्यांचा सह्याद्री अंक आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विद्यालयाच्या विद्यार्थिनींकडून जवानांचे औक्षण आणि रक्षाबंधन करून संकलित राख्यांचे बॉक्स प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते जवानांकडे सुपूर्त करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी मेजर कमांडो श्री लक्ष्मण ढोले, सुभेदार बाळशीराम झिटे ,स्वराज्य सैनिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कोटकर, संस्थेचे संस्थापक पोखरकर साहेब , संस्थेचे कार्याध्यक्ष सुनील थोरात , संस्थेचे खजिनदार आनंदा गीते ,समाजसेविका वीरपत्नी शिलाताई करंजेकर, हवालदार सुभाष तांगटकर, रघुनाथ पवार साहेब, मायकल गायकवाड साहेब, गोविंद खरडे साहेब, गोकुळ मतकर साहेब, विद्यालयाचे पर्यवेक्षक आप्पासाहेब तुरकणे सर, श्रीमती संगीता रणशूर मॅडम, ज्येष्ठ शिक्षक एस एम खेमनर सर , शिक्षक प्रतिनिधी किशोर शिंदे सर, शिक्षिका प्रतिनिधी, श्रीमती शहाबाई सोनवणे मॅडम,क्रीडाशिक्षक मिलिंद औटी सर , कलाशिक्षक मिनीनाथ जोर्वेकर सर, ज्येष्ठशिक्षिका सुरेखा दिघे मॅडम, उज्वला घुले मॅडम, विठ्ठल गायकवाड, एकनाथ भागवत,तसेच शिक्षक व शिक्षिका ,शिक्षकेत्तर सेवक वृंद, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्येष्ठ शिक्षक एस एम खेमनर सर, क्रीडाशिक्षक मिलिंद औटी, कलाशिक्षक मिनीनाथ जोर्वेकर,यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा देशमुख मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन एस एम खेमनर सर यांनी केले .


